एसटी सरकार गँगचा म्होरक्या नगरसेवक संजय तेलनाडे पुण्यात पोलिसांच्या ताब्यात... ?

मात्र कोल्हापूर पोलीस दलाकडून या बाबत अधिकृत दुजोरा मिळत नाही.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

इचलकरंजी सह परिसरात दहशतीचे साम्राज्य निर्माण केलेल्या आणि मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मे २०१९ पासून पसार झालेला एसटी सरकार गँगचा म्होरक्या नगरसेवक संजय तेलनाडेला पुण्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे.मात्र कोल्हापूर पोलीस दलाकडून या बाबत अधिकृत दुजोरा मिळत नाही.

तेलनाडे बंधू पैकी गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याला आज शनिवारी (दि.१) सकाळी पुण्यात ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post