इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मर्यादित स्वरूपात उत्साहात संपन्न


     


दैनिक हुपरी समाचार :

  इचलकरंजी :  बुधवार दि. २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने मुख्य ध्वजारोहण समारंभ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या शुभ हस्ते  नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात  कोव्हिड १९ च्या अनुषंगाने  शासनाच्या  निर्देशानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अनुपालन करून साधेपणाने आणि मर्यादित स्वरूपात परंतु उत्साहात  साजरा करणेत आला. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करणेत आले,

      या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व प्रकाश मोरबाळे, उप मुख्याधिकारी केतन गुजर,  लेखापरीक्षक प्रमोद पेटकर, लेखापाल

कलावती मिसाळ, सहा. नगररचनाकार रणजित कोरे,कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगर अभियंता संजय बागडे, जल अभियंता अंकिता मोहिते,सुभाष देशपांडे, विद्युत अभियंता संदीप जाधव, छ.शाहु हायस्कूल  मुख्याध्यापक शंकर पोवार,खरेदी पर्यवेक्षक प्रतापराव पवार, सामाजिक कार्यकर्ते सदा मलाबादे यांचेसह सरस्वती हायस्कूलचे शिक्षक जितेंद्र कुलकर्णी विद्यार्थी - विद्यार्थीनी  नगरपरिषद अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

  

   

Post a Comment

Previous Post Next Post