प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उदघाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले
दैनिक हुपरी समाचार :

इस्लामपूर : पाचगणी (ता. शिराळा) : येथे ३ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उदघाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री मा. ना. पाटील साहेब व आमदार नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले. 


या प्रसंगी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, तालुक्याच्या सभापती मनीषा गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, भूषण नाईक, गट विकास अधिकारी संतोष राऊत, विश्वासचे संचालक संभाजी पाटील व शिवाजी पाटील, कोंडीबा चौगले, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, आरळ्याचे उपसरपंच सदाजी पाटील, शंकर मोहिते, मणदूरचे उपसरपंच विजय चौगले, पाचगणीचे सरपंच शंकर पाटील, उपसरपंच सुषमा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पाटील, सविता पाटील, रामीत खैर, आशा पाटील व दीपाली पाटील, सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, गोविंद पाटील, अशोक चव्हाण, राघू कांबळे, हणमंत पाटील, राजाराम चव्हाण, रामचंद्र पाटील, सुरेश इनामदार, सखाराम आमले, आनंदा मोरे, बळी जाधव आदी मान्यवर व गुढे, पाचगणी, मानेवाडी, बांबरवाडी, खोतवाडी, येसलेवाडी, भांडुगळेवादी या गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post