सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करताना झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी.

पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कारची झडती घेतली.


दैनिक हुपरी समाचार ऑनलाइन :

 कराड - सोलापूर येथील सराईत गुन्हेगाराचा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. यावेळी धावत्या इनोव्हा कारमधून संशयिताला दरवाजा उघडून बाहेर ओढण्याच्या प्रयत्नात पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी घसरल्याने तो जखमी झाला.दरम्यान, संशयिताने विद्यानगर येथे समोर पोलिस दिसतच कार भर रस्त्यात सोडून गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. साबिर मुल्ला असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार विटा बाजूकडून कराडकडे येत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस कर्मचारी साबिर मुल्ला यांना मिळाली. तसेच संशयिताजवळ पिस्तूल व इतरही अनेक संशयास्पद साहित्य असल्याचेही अचानक समजल्याने कोणताही वेळ न घालवता साबिर मुल्ला यांच्यासह मयूर देशमुख हे दोघेजण दोन दुचाकीवरून त्वरित संशयितांना पकडण्यासाठी रवाना झाले. त्याच दरम्यान विटा बाजूकडून भरधाव वेगात इनोवा कार आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

साबिर मुल्ला व मयूर देशमुख यांनी दुचाकीवरून इनोवा कारचा पाठलाग सुरू केला. कृष्णा कॅनाॅलजवळ आल्यानंतर साबिर मुल्ला यांनी धावत्या दुचाकीवरूनच इनोवा कारचा दरवाजा उघडून संशयित चालकाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान इनोवा कार चालकाने झटका देऊन स्वतःला साबिर मुल्लाच्या हातातून सोडवून घेत तेथून पलायन केले. साबिर मुल्ला यांची दुचाकी घसरली व ते जमिनीवर पडून जखमी झाले. मयुर देशमुख व इतर नागरिकांच्या मदतीने साबिर मुल्ला यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

दरम्यान, संशयितांनी भरधाव वेगात इनोवा कार कृष्णा कॅनाॅलवरून विद्यानगर मार्गे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. विद्यानगरमधील साई गार्डन समोर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी थांबले होते. संशयितांना पुढे पोलिस असल्याचे दिसताच त्यांनी रस्त्यात मध्येच इनोवा कार उभा करून तेथून गर्दीचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी वाहतूक कोंडी का झाली आहे म्हणून पाहिले असता त्यांना रस्त्यात मध्येच कार उभी दिसली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कारची झडती घेतली.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार