सायकलस्वारांचे पहिले सायकलिंग संमेलन खेड येथे संपन्न.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

दैनंदिन जीवनात सायकलिंगचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच कोकणातील सायकलस्वारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने कोकणातील सायकलस्वारांचे पहिले सायकलिंग संमेलन खेड येथे आयोजित करण्यात आले होते.येथील पाटणे लॉन येथे आयोजित केलेल्या या संमेलनात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बरोबरच नांदेड येथील सायकलस्वार देखील सहभागी झाले होते. या संमेलनात सायकल क्षेत्रातील दिग्ग्जानी मार्गदर्शन केले. आखिर महाराष्ट्र गिर्यारोहण संघाचे उपाध्यक्ष धनजंय मदन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनात रत्नागिरी जिल्हा सायकलमय करण्याचा निर्धार करण्यात आला.

सायकलिंग करणे हे आरोग्यच्या दृष्टिने अतिशय महत्वाचे आहे. नेहमी सायकल चालविल्याने चांगल्या प्रकारचा व्यायाम होऊन आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. सायकलिंगमुळे आरोग्यदायी आणि तणावमुक्त आयुष्य जगता येते. मात्र सध्याच्या गतिमान युगात सुदृढ आयुष्य ठेवणारी सायकल मागे पडून दुचाकी, चारचाकी वाहनांना पसंती दिली जात आहे. गेल्या काही वर्षात बाजारात अनेक प्रकारच्या दुचाकी आणि चारचाकी आल्या आहेत. शिवाय हे वाहने हप्त्यांवर मिळत असल्याने पूर्वीचे महत्वाचे वाहन असलेली सायकल कालबाह्य होताना दिसत आहे.

कालबाह्य होत असलेल्या सायकलला पुनः गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न खेड तालुका सायकलिंग क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा असून त्यासाठीच या आगळ्या वेगळ्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही वर्षात सायकलचा वापर कमी झालाय हे जरी खरे असेल तरी आता सायकल चालविण्याने आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे अनेकांच्या लक्षात यायला लागले आहेत त्यामुळे जिल्ह्यात सायकल संस्कृती झपाटयाने वाढताना दिसत आहेत. हे सायकलिंग बाबत जनजगृती करण्याऱ्या सायलस्वारांसाठी शूभसूचक आहे. खेड येथील पाटणे लॉनवर आयोजित केलेल्या या संमेलनात उपस्थितीत सायकल स्वारांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे संमेलन आयोजित करण्यासाठी सायकलिंग क्लबसह काही स्वयंसेवी संघटनांनी देखील पुढाकार घेतला होता.

या सायकल संमेलनांमध्ये रायगड, सिंधुदुर्ग तसेच नांदेड येथील सायकलस्वार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे रायगड जिल्हयातील काही बच्चेमंडळींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या संमेलनाची सुरवात सायकल रॅलीने करण्यात आली. सायकलींमुळे आजारातून मुक्त झालेले अमित लड्ढा, मृत्युन्जय खातू, शैलेश मोरे, आणि आपल्ले अनुभव सांगितले. पनवेलहून सायकल घेऊन आलेले प्रसाद कर्वे, अमेय खांडेकर, सिंधुदुर्गाहुन आलेले अभिषेक फाले, महाडचा यश म्हसकर, कैसर देसाई, नांदेडचे शिवाजी पाटील यांनीही सायकलिंगबाबतचे आपले अनुभव कथन केले.

या संमेलना दरमायन सायकलिंगमध्ये एस आर 'किताब मिळवलेले जिल्हयातील श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले, डॉ स्वप्नील दाभोळकर, प्रसाद आलेकर, विक्रांत आलेकर, रोशन भूरन, शैलेश पेठे, मिलिंद खानविलकर, केतन पालवणकर यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार