लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) निवडणूकीत सत्तारूढ आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला

 दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर: राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) निवडणूकीत सत्तारूढ आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे.तर दिग्गिज नेत्यांना टक्कर देत शिवसेना प्रणित समविचारी आघाडीने 3 जागा काबिज केल्या आहेत. सत्तारूढ गटाच्या सहा जागांच्या उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आबिटकर यांचा भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे  यांना पराभवाचा धक्का देत बॅंकेत संचालक म्हणून प्रवेश केला.

 • पहिल्या सत्रात मतपत्रिका गटनिहाय वेगळा केल्या जात आहेत.

 • जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सुरुवात होताच मतपेटीत पन्नास रुपये ओवाळणी म्हणून दिले आहेत.

 • बँकेत सगळेच चोर प्रशासक नेमा मतदारांनी चिठ्ठीतून व्यक्त केली खंत.

 • मतदान केंद्रावर मंडलिक-पाटलांनी लावली हजेरी.

 • रणवीर गायकवाड ६६ मते घेऊन निवडून आले. सर्जेराव पाटील ३२ मते. शाहूवाडी सेवा संस्था गट.

 • शिरोळात राजेंद्र पाटील-यड्रावकरच 'किंग';गणपतराव पाटील यांचा पराभव

 • कृषी पणन गटातून बाबासाहेब पाटील आसुर्ले कर व संजय मंडलिक विजयी.

 • संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, रणवीर, सुधीर देसाई यांची विजयी सलामी

 • विरोधकांनी खाते उघडले : मंडलिक, आसुर्लेकरांचा विजय

 • पन्हाळ्याचा गड कोरेंनी राखला ; २४३ पैकी २०३ मते

 • आबिटकर विजयी, आवाडेंचा 'करेक्ट कार्यक्रम';पपतसंस्था गटाचा निकाल ः हसन मुश्रीफांना शह

 • इतर संस्था गटात भैय्या मानेंचा 'डंका';सत्तारूढ गटाला बळ ः विरोधी पॅनेलचे क्रांतिसिंह पवार पराभूत

 • दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच: यड्रावकर, रणवीर गायकवाड आमच्यासोबतच;मंडलिक यांचा दावा

 • विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील निकाल असा

  स्मिता युवराज गवळी - ४८८७

  विश्वास शंकरराव जाधव - २४९५

 • शाहूवाडीतून रणवीर यांचा दणदणीत विजय

 • महिला गटातून सत्तारूढ आघाडीच्‍या निवेदीता माने, श्रुतिका काटकर विजयी

 • वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; रणवीरसिंग गायकवाडांचा दणदणीत विजय

 • कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक निकाल

  विकास सेवा संस्था गट

  आजरा- सुधीर देसाई

  भुदरगड -रणजितसिंह पाटील

  गडहिंग्लज- संतोष पाटील

  पन्हाळा- आमदार विनय कोरे

  शाहुवाडी- अपक्ष रणवीरसिंह गायकवाड

  शिरोळ- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

 • इतर मागासवर्गीय गट

  विजयसिंह माने

 • इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट

  प्रताप उर्फ भैय्या माने

 • अनुसुचित जाती गट

  आमदार राजू आवळे

 • भटक्या विमुक्त जाती जमाती

  स्मिता गवळी

 • महिला प्रतिनिधी गट

  निवेदीता माने

  श्रुतिका काटकर

 • प्रक्रिया गट

  संजय मंडलिक

  बाबासाहेब पाटील

 • नागरी बॅंक पतसंस्था गट

  अर्जुन आबिटकर

 • 18 जागा जिंकून सत्तारूढचा एकतर्फी विजय; शिवसेनेचा 3 जागांवर कब्जा

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार