जिल्हा बँके निवडणूक : अजब प्रकार समोर

 मतपेटीत मतदाना ऐवजी मतदारांना चिठ्या आणि पैसे सापडले .


दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणीला आज शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली.मात्र निकाल लागण्या आधीच अजब प्रकार समोर आला आहे. मतपेटीत मतदाना ऐवजी मतदारांना चिठ्या आणि पैसे सापडले आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकाला पेक्षा ह्याच प्रकाराची मतदान केंद्रावर चर्चा रंगली आहे.

'आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा आता काय ?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,' असे मतदारांनी लिहिले आहे.

'उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे', असे एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर चक्क एका मतदाराने मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये मत मोजणीवेळी सापडले.

  मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ४७ मतांनी विजयी आता पर्यत हाती आलेल्या निकालानुसार विकास सेवा संस्थातून पाच उमेदवार विजयी झाले आहेत. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ४७ मतांनी विजयी झाला आहे. त्यांना ९८ मते मिळाली. विरोधी गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाली. तर, पन्हाळा गटातून आमदार विनय कोरे विजयी झाले आहेत. शाहूवाडी विकास संस्था गटातून रणवीर मानसिंगराव गायकवाड. आजरा गटातून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई, गडहिंग्लज संतोष पाटील विजयी झाले आहेत.

          प्रकाश आण्णा आवाडे पराभूतजिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे उमेदवार व आमदार प्रकाश आबिटकर यांनी एकतर्फी विजय मिळवत या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांना धक्का दिला.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार