कोल्हापूरआज आणखी एक ओमिक्रॉन रूग्ण सापडला .

 नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :


कोल्हापुर : शहरात आज आणखी एक ओमिक्रॉन रूग्ण सापडला आहे.हा रुग्ण 57 वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क,राजहंस प्रिंटर्स जवळ, परिसरातील रहिवाशी आहे. जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण आहे. त्याच्या प्रवासाचा इतिहास नाही. एका कार्यक्रम सोहळ्यासाठी त्यांच्या घरी गोव्याहून व्यक्तीं आली आहे. यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापालिका आरोग्य विभाग याचा शोध घेत आहे. नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोल्हापुरात २९ डिसेंबरला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. आयटीआय (ITI) पाठीमागे असणाऱ्या हनुमान नगरातील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोना झाला होता. यापैकी दोघांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या 4 पैकी 3 व्यक्तींचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले होते. यातील एका रुग्णाचा ओमिक्रॉन अहवाल  आला होता. दरम्यान पुन्हा आज एक ओमायक्रॉन रूग्ण सापडला आहे.

मुंबईत ओमिक्रॉनचा सामुहिक संसर्ग पसरला असून मुंबईतील 141 नागरिकांना ओमिक्रोनचा संसर्गझाला आहे. पालिकेने मुंबईतील कोविड बाधितांच्या अहवालाचे जिनोम सिक्वेसिंग केले होते. 21 ते 23 डिसेंबरदरम्यान 375 कोविड बाधितांचे  जिनोम सिक्वेसिंग करण्यात आले. याचा अहवाल पालिकेला (BMC) मिळालेला असून यात 141 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यातील अनेकांना सौम्य लक्षण असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईच्या ३७ टक्के नागरिकांचा परदेशात प्रवास नसतानाही त्यांना ओमिक्रॉनची बाधा झालीय.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार