भाजपच्या टाळा ठोकोआंदोलना मुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ हादरून गेलेदैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम", "मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो", अशा घोषणांनी उद्योग भवन दणाणून सोडत भाजपने टाळा ठोको आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आज (दि.२७) हादरून गेले.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी (Kolhapur BJP) कार्यालयाच्या गेटला कुलूप घालण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलीसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

६ जानेवारी २०२२ रोजी भाजप कार्यकर्त्यांनी, महानगरपालिकेकडे साठलेला व कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात त्याठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता.

वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या २१ दिवसात प्रदूषण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे कारवाई न झाल्यास नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार आज विजय जाधव, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी उद्योग भवनासमोर जमले आणि घोषणा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या गेटजवळ अडवले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

"नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम", "मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो", अशा घोषणा देत उद्योग भवन हादरवून टाकले. त्यानंतर पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी आंधळे व उपविभागीय अधिकारी माने यांना कार्यकर्त्यांना समोर पाचारण केले.

"२१ दिवसांपूर्वी प्रकार उघडकीस आणूनही अजून कारवाई का केली नाही ? पाणी प्रदूषणाची नोटीस दोन दिवसांत देता मग कचऱ्याच्या नोटीसीला इतका वेळ का ? महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी तुमचे लागेबांधे आहेत का ? कचऱ्याचा प्रश्न पाण्या इतकाच महत्वाचा नाही का ? " अशा संतप्त सवालांनी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

अधिकारी यातील कोणत्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. त्यातच उपविभागीय अधिकाऱ्यांनी (दि.२४) जानेवारी रोजी महापालिकेस नोटीस पाठवल्याची माहिती दिल्यामुळे, "ही माहिती आंदोलनापूर्वी का दिली नाही? पोलीस यंत्रणेचा वेळ घालवण्यासाठी हे केले काय ? आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच नोटीस कशी निघाली ?" असे प्रश्न विचारत कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले.


1 Comments

  1. CASINO in San Jose, CA - JMT Hub
    CASINO is located in San Jose, 대구광역 출장안마 California. JMT's current 광주광역 출장샵 facilities include outdoor seating, a live show, and a 부산광역 출장마사지 restaurant. All 강원도 출장마사지 of JMT's 서산 출장안마 rooms feature

    ReplyDelete
Previous Post Next Post