५ लाख रुपये लाचेची मागणी करून १० लाख रुपये स्वीकारणाऱ्या दोघा कॉन्स्टेबलना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले

 


दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : स्क्रॅप वाहनांच्या विक्रीमध्ये तडजोड करण्यासाठी २५ लाख रुपये लाचेची मागणी करून १० लाख रुपये स्वीकारणाऱ्या दोघा कॉन्स्टेबलना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले.पोलीस कॉन्स्टेबल विजय कारंडे, किरण गावडे अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या एका खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदारांच्या मुलाचा प्रतिभानगर येथे स्पेअर पार्टस विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने मुंबईहून एक स्पोर्टस कार स्क्रॅपसाठी खरेदी केली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कॉन्स्टेबल विजय कारंडे व किरण गावडे यांना मिळाली.

या दोघांनी तक्रारदारांच्या मुलास तु मुंबईहून आणलेली मोटारसायकल चोरीची असून तुझ्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची भिती घालत याप्रकरणी तडजोड करण्यासाठी त्याच्याकडे २५ लाख रुपयाची मागणी केली.

याबाबत त्यांनी तत्काळ लाचलुचपत विभागात तक्रार दिली. त्यानंतर या दोघांच्यावर सापळा रचला असता लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबल कारंडे व गावडे यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post