महात्मा गांधी स्मृतीदिन संपन्न

 

पापाची तिकटी येथे विविध संघटनां तर्फे अभिवादन 

दैनिक हुपरी समाचार :

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आज ही महात्मा गांधींचे विचार अमंलात आणणे काळाची गरज असे मनोगत अॅड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.पापाची तिकटी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अॅड.धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 

यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे,जमजम फौंडेशनचे हाजी फिरोजभाई सतारमेकर, लहुजी साळवे  प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, सतीश कुंभार बाचणीकर,बिल्डर दिलीप कदम,हाजी निस्सार सतारमेकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post