सहा आमदार निवडून आणणार म्हणजे त्यांनी जरा कमीच आकडा सांगितला

          ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 


दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागा आहेत. त्यातील सहा आमदार निवडून आणणार म्हणजे त्यांनी जरा कमीच आकडा सांगितला असल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांना सोमवारी येथे लगावला.जिल्हा बँकेत विरोधी शिवसेनेच्या आघाडीतील निवडून आलेल्या तिघांच्या रविवारी झालेल्या सत्कारावेळी मंडलिक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सहा आमदार निवडून आणण्याचा निर्धार जाहीर केला हाेता. याबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, त्यांनी काय ठरवलंय, काय करणार आहेत, हे त्यांनाच माहिती. पण विधानसभेच्या दहा जागा असताना सहा म्हणजे त्यांनी जरा कमीच सांगितल्या म्हणायच्या.

जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारातही मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. कागलच्या राजकारणात मुश्रीफ-मंडलिक गट एकत्र असल्याने ते करत असलेल्या एकमेकांवरील टीकेला महत्त्व आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post