कोल्हापुरात तिसऱ्या लाटेचा धोका अटळ आहे, त्या मुळे निर्बध येणारच...हसन मुश्रीफ
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर : फेब्रुवारी महिन्यात कोल्हापुरात तिसऱ्या लाटेचा धोका अटळ आहे, त्यामुळे निर्बध येणारच आहेत.ते आता उबंरठ्यावर आले आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या आता वाढून लोक गावी येतील, त्यानंतर पुन्हा येथील संख्या वाढेल. त्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. मात्र ६५ ते ७० टक्के लोकांना दवाखान्यात दाखल करायची गरज भासत नाही. त्यांना घरीच उपचार घेता येतात, काहींनाच आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागते. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. केवळ निर्बंध पाळणे आवश्यक आहे, असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, की दुसऱ्या लाटेचा विचार करता ती पहिल्यांदा मुंबई, पुणा, केरळ, दिल्ली अशा ठिकाणी ती आली. त्यानंतर शेवटी ती लाट कोल्हापुरात पोचली. तिसऱ्या लाटेचेही असेच होणार आहे. देशात आपण कोणाला आडवू शकत नाही. मुंबईत वीस हजार रुग्ण झाल्यास लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे कालच आयुक्तांनी जाहीर केले आहे. सध्या कोल्हापुरात संख्या कमी आहे, टेस्टींग ही कमी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव विचारात घेवून ऑक्सिजन आणि बेडची उपलब्धता आपण केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट बसविले आहेत. कालच पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आढावा घेतला आहे. मीही कागल मध्ये बैठक घेतली आहे. मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तेथेही जावून बैठक घेणार आहे.
अन्य प्रश्नांवर मंश्री मुश्रीफ म्हणाले,'' बुस्टर डोस फ्रंट वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय आजच झाला आहे. त्यानुसार त्याचेही नियोजन सुरू आहे. ते कोल्हापुरातही दिले जातील. तसेच लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी आहेत, लॉकडाऊन नको अशी मानसिकता असली तरीही निर्बंध आवश्यक आहेत. मास्क वापरा म्हटले तर वापर नाहीत, गर्दी करू नका म्हटले तरीही करतात. लहान मुलांना याची लागन होऊ नये म्हणून जादा खबरदारी घेण्याची गरज आहे. कालच आरोग्य मंत्र्यांनी सांगितले, की देशभरात एकच नियम असावेत, कर्नाटकात ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर सक्तीचे केले आहे, असे होऊन चालणार नाही. राज्यात आणि देशात एकच निर्बध आवश्यक आहेत. कोणालाच लॉकडाऊन नको आहे. या मुळे शासनाचाही महसूल बडुतो. पण याला पर्याय नाही.
Comments
Post a Comment