बाधितांच्या संख्येतील ही तफावत सुन्न करणारीदैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर :  जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे एका दिवसांत १७६ नवे कोरोना बाधित सापडल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्हा शासकीय सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रयोग शाळेत ९०० स्वॅब चाचणीत फक्त ४० जण कोरोना बाधित सापडले; तर खासगी प्रयोगशाळेत ५७९ चाचण्या पैकी १५३ व्यक्ती बाधित सापडल्या.बाधितांच्या संख्येतील ही तफावत सुन्न करणारी आहे.

कोरोना वाढला की, लॉकडाउन होतो यांची भीती बहुतेकांना आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येवर चिंता व्यक्त होत आहे. राज्यातील शासकीय प्रयोग शाळातील तपासणीत बाधितांचे प्रमाण शंभरात सरासरी ३ टक्के आहे; तर खासगी तपासणीत शंभरात ३ ते १२ टक्के असे प्रमाण आहे. त्यानुसार खासगी प्रयोगशाळेत बाधित अधिक तर शासकीय प्रयोगशाळेत बाधित सापडण्याचे प्रमाण नगन्य आहे. तज्‍ज्ञांच्या मतानुसार सर्दी, ताप, खोकला, घशात, खवखव तसेच फुप्फुसात किंवा नाकातील संसर्ग असल्यास कोरोनाची लक्षणे मानली जातात. अशांचे स्वॅब तपासणी होते.

चाचण्या वाढल्या तेव्हा बाधित वाढले असेही दिसते. ज्या जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळा नाहीत अशा स्वॅब तपासणी नजीकच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणी होते तेथेही कोरोनाबाधितांचे प्रमाण शंभरात २ ते ४ आहे. शहरात अनेकजण खासगीत उपचाराला जातात. तेव्हा लक्षणे असली किंवा नसली तरी कोरोना चाचणी करावी लागते. तिथेच खासगीत स्वॅब तपासणी करून घेतली जाते. शहरात रुग्ण संख्या वाढ तर ग्रामीण भागात स्वॅब तपासणीच्या खासगी सोय नसल्याने तेथे बाधितांचे प्रमाण कमी दिसते.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार