तर ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे आग्रही असल्याने येथे महाविकास आघाडीत पेच होण्याची शक्यता आहे.यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार यावर आता पुढील समीकरणे अवलंबून असणार आहेत.

त्यात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिदिनी शिवसैनिकांना संबोधित करताना सर्व निवडणुका लढविण्याचा संदेश दिला होता. त्यामुळे शिवसैनिकांनाही या जागेसाठी उत्साह आला आहे. मात्र काॅंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेचा उमेदवार येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेमुळे उत्तरमधून लढण्याच्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे. २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून ते २०१९ पर्यंत कोल्हापूर उत्तर हा शिवसेनचा बालेकिल्ला राहीला आहे. शिवसनेने १९९० मध्ये हा मतदारसंघ ताब्यात घेतला, त्यावेळी कै. दिलीप देसाई शिवसेनेचे या मतदार संघाचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर ९५ व ९९ च्या निवडणुकीत हा बालेकिल्ला माजी आमदार सुरेश साळोखे यांनी शाबूत ठेवला. २००४ मध्ये माजी आमदार मालोजीराजे यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला, पण त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत श्री. क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ लाही श्री. क्षीरसागर हेच आमदार राहीले. २०१९ मध्ये मात्र काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

तर तिरंगी लढत

भाजपकडून ही निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन्हीही पोटनिवडणुकांत भाजपने उमेदवार उभे केले आहेत, यापैकी पंढरपुरची जागा भाजपने तर देगलूरची जागा काॅंग्रेसने जिंकली. त्या धर्तीवर ही जागाही लढवण्याचे भाजपच्या पातळीवर निश्‍चित आहे. भाजप रिंगणात उतरले आणि शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढत म्हणून शड्डू ठोकला तर ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post