थर्टी फर्स्ट नाइटला केवळ 18 तळीराम चालक सापडले, तर अन्य नियम मोडणाऱ्यांची संख्या दोन हजारांच्या आसपास होती.
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
मुंबई : थर्टी फर्स्ट नाइटला शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. शिवाय घरातच नववर्षाचे स्वागत करा, बाहेर पडून गर्दी करू नका या शासनाच्या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला.परिणामी मुंबईमध्ये शुक्रवारी रात्री केवळ 18 तळीराम चालक सापडले, तर अन्य नियम मोडणाऱ्यांची संख्या दोन हजारांच्या आसपास होती.
शहरात शुक्रवारी रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी संशयित वाहनचालकांची कसून चौकशी केली जात होती. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंद केले. त्यामुळे जास्त वाहने रस्त्यावर नव्हती. केवळ 18 ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, 12 रॅश ड्रायव्हिंग, 408 विनाहेल्मेट, 16 ट्रीपल सीट तसेच इतर मोटार वाहन कायद्यान्वये एक हजार 375 जणांवर कारवाई करण्यात आली. सर्वाधिक चार तळीराम भोईवाडय़ात तर तीन तळीराम ओशिवरा येथे पकडण्यात आले. विनाहेल्मेटच्या सर्वाधिक 66 कारवाया घाटकोपर येथे करण्यात आल्या. डोंगरीत रॅश ड्रायव्हिंगच्या पाच कारवाया करण्यात आल्या.
Comments
Post a Comment