मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवरील बुधवारी सुनावणी

 


दैनिक हुपरी समाचार :

मुंबई : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटना पीठाने येत्या बुधवारी दालनात ठेवली आहे.न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय पीठाने मराठा आरक्षण रद्द केले होते. या संदर्भातील फेरविचार याचिका विनोद पाटील आणि राज्य सरकारनेही सादर केली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण निवृत्त झाल्याने या पीठावर नवीन न्यायमूर्तीची नियुक्ती सरन्यायाधीशां कडून होईल. 

मराठा समाजातर्फे आम्ही बाजू मांडूच, परंतु राज्य सरकारनेही आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत, असे पाटील यांनी सांगितले.राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करताना नमूद केले होते. पण केंद्र सरकारने संसदेत घटनादुरुस्ती करून राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित असल्याचे स्पष्ट केले आहे. यासह अन्य मुद्दे अ‍ॅड संदीप देशमुख आमच्यातर्फे सुनावणीत मांडतील, असे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post