समीर वानखेडे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवत

 गोव्यात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई : मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे सर्वात जास्त चर्चेत राहिले. त्यांच्या कामावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले

.दरम्यान, या सर्व प्रकरणात आता पुन्हा एकदा समीर वानखेडे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला असल्याचे दिसत आहे. कारण समीर वानखेडे यांनी आणखी एक कारवाई केली आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गोव्यात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. एनसीबीच्या निवेदनानुसार, गोव्यातील सिओलीम येथून दोन महिला ड्रग्ज तस्करांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

एका गुप्त माहितीवर कारवाई करत, मुंबई आणि गोवा झोनच्या एनसीबी पथकांनी घटनास्थळावरून १.३० किलो गांजा आणि ४९ टॅबलेट,२५ ग्रॅम अॅम्फेटामाइन, २.२ ग्रॅम कोकेन, १ ग्रॅम एमडीएमए पावडर आणि एक वाहन जप्त केले. प्राथमिक तपासानुसार, एक महिला एमडीएमए आणि इतर औषधे पुरवत होती. ती ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्या एका नायजेरियन महिलेसाठी काम करत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की गोव्यातील एक महिला आरोपी ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्या इतर नायजेरियन महिला आरोपींच्या वतीने एमडीएमए आणि इतर ड्रग्स पुरवत असे. सिंडिकेटमध्ये आणखी काही सदस्य असून परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोपी महिलांची स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार