केंद्र सरकारने नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 च्या तपासणीं मध्ये वाढ करण्यास सांगितलेदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 नवी दिल्ली - देशात करोना विषाणूचे नवीन स्वरुप ओमायक्रॉनसह करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याचे समोर आले आहे. संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 च्या तपासणींमध्ये वाढ करण्यास सांगितले आहे.लवकर निदान झाल्यास इतरांना संक्रमित होण्यापासून बचाव करता येईल.

तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, मेघालय, जम्मू काश्मीर आणि बिहार या राज्यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी वाढती प्रकरणे आणि संसर्गामुळे कोविड-19 चाचणीचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आहुजा यांनी 5 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुरेशा चाचणीशिवाय समुदायामध्ये संसर्गाची नेमकी पातळी निश्चित करणे अशक्य आहे. ओमायक्राॅनची प्रकरणं वाढत आहेत. चाचणी वाढवण्यासह सर्वांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे. ओमायक्राॅन हा अत्यंत संसर्गजन्य आहे आणि बहुतेक संक्रमितांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे एखाद्याला संसर्ग होताच त्वरित तपासणी केल्यास इतरांना संसर्ग होण्यापासून बचाव करता येईल. राज्यांना परीक्षण साहित्य, किट इत्यादींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची आणि चाचणी सुविधांशी संबंधित आवश्यक वस्तूंसाठी नियमित व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी भारतात करोना विषाणूचे नवीन स्वरूप ओमायक्रॉनची एकाच दिवसात सर्वाधिक 495 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. या संसर्गाच्या प्रकरणांची संख्या 2,630 झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार