पुणे : रात्रीची संचार बंदी, शैक्षणिक संस्था बंद आणि उद्याने, पर्यटनस्थळे बंद

 

दैनिक हुपरी समाचार :

पुणे - करोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने निर्बंधाबाबतचे आदेश रविवारी जारी केले आहेत. रात्रीची संचार बंदी, शैक्षणिक संस्था बंद आणि उद्याने, पर्यटनस्थळे बंद यांचा या निर्बंधात समावेश आहे.

लागू असलेले निर्बंध....

.पहाटे 5 ते रात्री 11 या वेळेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदी. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्‍यक कारणा शिवाय घराबाहेर पडण्याला बंदी

आस्थापनांनी 'वर्क फ्रॉम होम'वर भर द्यावा, अत्यावश्‍यक असल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे.

*कार्यालयात एकावेळी एकूण कर्मचाऱ्यांच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थितीला बंदी
ज्यांचे लसीचे दोन डोस घेऊन झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी. इतरांना प्रवेशबंदी

*कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजावे. सॅनिटायझरची व्यवस्था आवश्‍यकच
लग्नासाठी जास्तीत जास्त 50 जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी

*राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमाला जास्तीत जास्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी

*शाळा आणि कॉलेज 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील. प्रशासकीय काम, लसीकरण, ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये येणारे शिक्षक यांना प्रवेश मिळेल पण त्यासाठी त्यांना लसचे दोन डोस घेण्याचे बंधन लागू असेल.

*जलतरण तलाव, वेलनेस सेंटर पुढील आदेशापर्यंत बंद

*प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आणि खेळाडूंचा सराव सुरू राहील. संबंधित अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत असलेले फिजिओ, डाएट एक्‍स्पर्ट आदींना केंद्र सरकारच्या नियमांनुसार क्वारंटाइनच्या बंधनांचे पालन करावे लागेल.

*स्पर्धेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत असलेले फिजिओ, डाएट एक्‍स्पर्ट आदींना दर तिसऱ्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागेल. इतर खेळांच्या स्पर्धांना आणि सरावाला बंदी.

*मनोरंजनाची उद्याने, प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये, संग्रहालये, किल्ले, सर्व पर्यटनस्थळे आणि जिथे तिकीट काढून जावे लागते अशी पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवली जाणार.
मॉल, मार्केट येथे लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश. मॉल आणि मार्केट रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन.

*रेस्टॉरंट तसेच लहान-मोठी हॉटेल येथे क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद. होम डीलिव्हरी सुरू राहील.

*नाट्यगृहे आणि सिनेमागृहे येथे क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद.

*केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच मालवाहतूक करण्यास परवानगी.

*सार्वजनिक वाहतूक सुरू. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश.

*केंद्र तसेच राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अखत्यारितील सर्व परीक्षा होतील. निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट, लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, शरीराचे सामान्य तापमान आणि योग्य तिकीट सोबत असल्यास रेल्वे, विमान, बसमधून प्रवासाकरिता परवानगी अत्यावश्‍यक अधिकारी-कर्मचारी यांना लसचे दोन डोस घेतले असतील आणि शरीराचे सामान्य तापमान असेल तर कामासाठीच्या प्रवासाला परवानगी.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार