महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी पुणे शहरच्या वतीने

  भारतीय स्त्री शक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला .

 या महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले


दैनिक हुपरी समाचार :

 पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी पुणे शहरच्या वतीने भारतीय स्त्री शक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती दरम्यान या महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले कमल व्यवहारे, मंगल पगारे ,आबेदा इनामदार ,माया चव्हाण, संध्या राम नगरकर ,शकुंतला बारड यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानपत्र देण्यात आले. अद्वैता उमराणीकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संघटन विचारावर मार्गदर्शन केले, तर मेघना जुजम यांनी सावित्रीबाईंच्या योगदानावर मार्गदर्शन केले. या दोन्ही मार्गदर्शकांचा सत्कार मनसे कार्यालयात मनसे महिला आघाडी शहराध्यक्ष वनिता वागस्कर, जिल्हाध्यक्ष सुशिला नेटके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पुणे शहर मनसे महिला आघाडीच्या शहर सचिव पुष्पा कनोजिया, गायत्री लंबूगोल, उपशहर प्रमुख अस्मिता शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्त्रीशक्ती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला होता. राजमाता जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

' जिजाऊ आणि सावित्रीबाईंसारखे केवळ दिसणे आणि वेशभूषा करुन उपयोगाचे नाही, तर त्यांचे गुण अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे 'असे मार्गदर्शन अद्वैता उमराणीकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार