सांगली जिल्ह्यातओमायक्रोनचा शिरकाव ..दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगली  :  अखेर ओमायक्रोनचा शिरकाव झाला आहे. महापालिका क्षेत्रात शंभर फुटीवरील गुलाब कॉलनी परिसरातील पती-पत्नीस कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरीएंटची लागण झाली आहे.हे दोन्ही रुग्ण दि. 25 डिसेंबरपासून ओमआयसोलेशन मध्ये आहेत. सध्या त्यांना कोणताही त्रास व लक्षणे नाहीत.

ओमायक्रोनची लागण झालेल्या या दोन्ही रुग्णांना परदेश अथवा मुंबई-पुणे प्रवासाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. खोकल्याचा त्रास झाल्यानंतर एका खाजगी प्रयोगशाळेत आर्टीपीसीआर चाचणी केली होती. दि. २५ डिसेंबर रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना होम आयसोलेट केले होते. दरम्यान ओमायक्रोन चाचणीसाठी जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले.

त्याचा अहवाल संबंधित खासगी प्रयोगशाळेकडून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या पुणे येथील राज्य सर्वेक्षण विभागकडे आला. तिथून आज जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे माहिती आली, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिकेचे नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात ओमायक्रोनचा शिरकाव झाल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ओमायक्रोनची लागण झालेले पती-पत्नी दि. २५ डिसेंबरपासून होमआयसोलेशन मध्ये आहेत. त्यामुळे ओमायक्रोनची लागण कोणापासून झाली याचा शोध अवघड झाला आहे. दरम्यान महापालिका प्रशासन वआरोग्य यंत्रणेने सतर्कता घेतली आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार