सांगली मध्ये बर्निग कारचा अजब थरार

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगली : सांगली मध्ये बर्निग कारचा अजब थरार पाहायला मिळाला आहे.पार्किंग मध्ये थांबलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला,त्यानंतर पेटलेली गाडी आपोआप विना चालक रस्तावर धावू लागली.याचा वेळी दखल झालेल्या अग्निशमन पथकाने आग विझवली.मात्र ही गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आयलँडला जाऊन धडकल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.पण चालका शिवाय गाडी धावल्याच्या प्रकारने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे घटना ?

सांगली शहरातील स्टेशन चौक याठिकाणी एका चार चाकी गाडी पार्किंग मध्ये उभी होती.रात्रीच्या सुमारास कडक्याच्या थंडीत या गाडीला आग लागली.ही लागल्याची बाब आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ शेजारी असणारी अग्निशमन दलाच्या पथकाला दिली,तशी पथक पाण्याचा बंब घेऊन दाखल झाले, पाण्याचा फवारा मारायला सुरुवात करताचा पेटलेली गाडी रस्त्यावर धावू लागली १०० फूट अंतर देखील गाडीने विना चालक पार करत रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या आयलँडला जाऊन धडक दिली.सुरुवातोल आसपासच्या नागरिकांना गाडी कोणी तर चालवत आहे,असं वाटलं पण अग्निशमन पथकाने आग विझवुन गाडीचा दरवाज उघडून पाहिले असता गाडीत कोणीचा आढळून आले नाही,त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले होते.पण तातडीने अग्निशमन दलाने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post