सांगलीतील इंजिनीअर महेशकुमार पाटील आणि त्याच्या टीमने कमी वेळेत म्हणजे अगदी तीन महिन्यांत स्मार्ट घर बांधले

 


सांगली : घर हा माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र जागेच्या आणि बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातं.अशातच सांगलीतील इंजिनीअर महेशकुमार पाटील आणि त्याच्या टीमने कमी वेळेत म्हणजे अगदी तीन महिन्यांत स्मार्ट घर बांधले आहे. तेही अगदी कमी खर्चात. मोनोलिथिक इंटेलिजन्स म्हणजे एकसंध बांधकाम आणि सुरक्षिततेवर भर देणाऱ्या, अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या घराची सध्या चर्चा आहे.

इंजिनीअर महेशकुमार पाटील आणि त्यांचे टीम सदस्य भूषण गोडसे आणि विशाल ननावरे यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी खर्च आणि कमी वेळेत घर बांधले आहे. या स्मार्ट घराचा प्रोटोटाईप प्रोजेक्ट त्यांनी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावात नुकताच पूर्ण केला. त्यांनी कांतीलाल बाड यांच्यासाठी 550 चौरस फुटांचे क्राँक्रीटचे मोनोलेथिक इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारित घर बांधले आहे. या घराचे बांधकाम एकसंध आहे. बांधकामात विटांचा वापर नाही. एकाच वेळी दरवाजे, खिडक्या, पोटमाळे, बाल्कनीचे डिझाईन केले. घरात सोलर विजेवर लाईटस् आणि पंखे चालतात. लाईटस् आणि पंख्यांना ऍलेक्साची व्हॉईस कंट्रोल व्यवस्था आहे. मुख्य दरवाजांना डिजिटल लॉक सुविधा देण्यात आली आहे. हे घर बांधण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. तसेच खर्चही 20 टक्के कमी आला. एखाद्या आरसीसी फ्रेम रचनेच्या वास्तूची जेवढी मजबुती असेल तेवढेच आम्ही बांधलेले घर मजबूत आहे, असा दावा महेशकुमार पाटील यांनी केला.

मोनोलिथिक इंटेलिजन्स ही संकल्पना जुनी असली तरी ग्रामीण लोकांना परवडणारी आणि अत्याधुनिक सुविधांयुक्त घरे बांधून देण्याचा आमचा प्रयत्न आहे . या घरासाठी आम्ही स्ट्रक्चरल अभ्यास केला . भार आणि क्रॅक कसे कमी करता येईल यादृष्टीने दरवाजे , खिडक्या यांचे डिझाईन केले . डिजिटल लॉक दिले . ग्रामीण लोकांना या सुविधा कशा वापरता येतील यावर अधिक लक्ष केले .

महेशकुमार पाटील आटपाडी

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार