राष्ट्रवादीने या नगर पंचायतीत एकूण १० जागांवर विजय मिळवला.
दैनिक हुपरी समाचार :
सांगली: कवठेमहंकाळ मध्ये नगरपंचायत निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने या नगर पंचायतीत एकूण १० जागांवर विजय मिळवला आहे.तर शेतकरी विकास गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान या विजयानंतर रोहित पाटील यांनी कवठे महंकाळमधील नागरीकांचे आभार मानले. आबांचे स्वप्न पूर्ण झालं अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर हा विजय विनम्रतेने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल,असे ही ते म्हणाले.
दरम्यान, या विजयानंतर भर रस्त्यावर कार्यकर्ते एकमेकांना भिडले. निवडून आल्यावर कार्यकर्त्यां एकमेकात भर रस्त्यावर निवडून आलेले आणि पराभव झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते यांच्यात मारहाण झाली. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थ करत कार्यकर्त्यांना बाजूला केले.
'माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही'
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहित पाटील यांच्यावर प्रचाराची भिस्त होती. वडिलांवरून त्यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पाटील यांनी माझा बाप तुम्हाला आठवल्या शिवाय राहणार नाही, अशी टिप्पणी केली होती. अखेर रोहित पाटील यांचा विजय झाला आहे.