कपिल शर्मा शो'सह अनेक टीव्हा शो मध्ये काम केलेल्या कलाकाराने केला आत्महत्येचा प्रयत्न

 तीर्थानंद राव असे या अभिनेत्याचे नाव आहे.दैनिक हुपरी समाचार :

मुंबई : कोविडमुळे अनेक क्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदांतर आले असून सामान्य नागरिकांसह सिने इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकारही यापासून वाचू शकलेले नाही.कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही अनेक कलाकारांनी आत्महत्या केली होती. आता 'द कपिल शर्मा शो'सह अनेक टीव्हा शोमध्ये काम केलेल्या कलाकाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. तीर्थानंद राव  असे या अभिनेत्याचे नाव आहे.

तीर्थानंद रावकडे सध्या काम नाही आणि यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. 'द कपिल शर्मा शो', 'क्राईम पेट्रोल' आणि 'सीआयडी' सारख्या लोकप्रिय शोमग्ये राव याने काम केले आहे. मात्र आर्थिक तंगीमुळे रावने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु शेजाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने रावला वाचवले.

रावने फेसबुक लाईव्ह देखील केले आणि आपल्या असिस्टंटला फोन करून आत्महत्या करणार असल्याचेही सांगितले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी रावशी संपर्क केल्याने त्याने आपली परिस्थिती कथन केली.

गेले 2 वर्ष संघर्षाचे राहीले आहेत. आर्थिक स्थिती खराब झाली असून सेव्हिंगही संपली आहे. मला पाव भाजीसारख्या चित्रपटामध्येसह काही वेबसीरिजमध्येही काम मिळाले, मात्र ते अजून प्रदर्शित झाले नाही. त्यामुळे मला पेमेंटही मिळाले नाही. गेल्याकाही दिवसांपासून मी वडापाव खावून दिवस ढकलतोय, असे रावने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या सर्व झंझटीपासून पळ काढण्यासाठी मी आत्महत्येसारखे पाऊल उचलले. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी असिस्टंटला फोन करून विरारचे घर माझ्या मुलीला देण्यासही सांगितले होते. परंतु असिस्टंटने मला वाचवले आणि पोलिसांना बोलावून रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला, असेही रावने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post