Posts

Showing posts from February, 2022

हुपरी शहराच्या अस्मितेसाठी आमरण उपोषण व बेमुदत गावबंद आंदोलन! :- मा. प्रतापराव जाधव

Image
हुपरी समाचार :      *हुपरी :  ‘आपला हा संघर्ष गेली चार वर्ष सुरु असून परिसराती दहा गावांना रोजीरोटी देणाऱ्या हुपरी शहराच्या अस्मितेचा हा प्रश्न असून त्यासाठी मरण आले तरी‌ माघार घेणार नाही,’ असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे हुपरी शहराध्यक्ष मा. प्रतापराव जाधव यांना केले. ते ‘चतुर्थ वार्षिक कर आकारणी’ संबधी मा.पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांना कॉंग्रेस कमिटी मार्फत देण्यात आलेल्या निवेदनानुसार मंगळवार दि. ०१ मार्च २०२२ रोजी आमरण उपोषण आंदोलन व गुरुवार दि. ०३ मार्च, २०२२ रोजी पासून पुकारलेल्या बेमुदत गावबंद आंदोलनाची माहिती देत होते. हुपरी नगरपरिषदेने इतर नगरपरिषदांपेक्षा अडीचपट जास्त कर आकारणी केली असून त्यानुसार मिळणाऱ्या महसुलातून आवश्यक सुविधा सुद्धा पुरवण्यास हे प्रशासन व  सत्ताधारी असफल झाले आहेत. त्यामुळे शासनाने कर आकारणी संदर्भात २०१९ मध्ये जे राजपत्र जारी केले आहे त्यानुसार कर आकारणी करावी व शहरातील जवळ जवळ तीन ते चार हजार मालमत्तांची नोंदनी न केल्याने नगरपरिषदचे झालेले गेल्या चार वर्षाचे महसूलीचे नुकसान भरपाई द्यावी आणि चतुर्थ वार्षिक कर आकारणी शासन आदेशानुसार

राजभाषा मराठी दिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेच्या आय जी एम सफाई कामगार यांच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न.

Image
हुपरी समाचार : इचलकरंजी :  राजभाषा मराठी दिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेच्या आय जी एम सफाई कामगार यांच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन सोहळा करण्यात आला.  उद्घाटन मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवि गोंदकर शहर अध्यक्ष प्रतापराव पाटील तालुका उपाध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी मनसे मराठी कामगार* *तालुकाध्यक्ष महेश शेंडे जिल्हा सरचिटणीस जावेद नदाफ उपजिल्हाध्यक्ष योगेश दाभोळकर शहर अध्यक्ष उत्तम गुरव शाखा अध्यक्ष पोपट हत्तीकर शाखा अध्यक्षा सगिता भडारी रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम सहकार सेना शहर अध्यक्ष योगेश तिवारी उपतालुकाअध्यक्ष दिपक पोवार महिला शहर अध्यक्ष स्मिता पवार , उपशहर अध्यक्ष संग्राम पोरे कृष्ण कोपार्डे उत्तम पाटील अण्णा जुवे मनोज पाटील ऋषिकेश पाटील मारूती जावळे राजेश माळी शेरु माळी प्रमोद भाटले महेश बकरे दिलीप जाधव रवि पाटील इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते*

राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचे काढलेले परिपत्रक पूर्णतः बेकायदेशीर ..राजू शेट्टी

Image
  हुपरी समाचार:  जयसिंगपूर :  ऊसदर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे; तो राज्यांना दिलेला नाही. तरीही राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचे काढलेले परिपत्रक पूर्णतः बेकायदेशीर आहे. राज्य सरकारमध्ये साखर कारखानदारांचे दरोडेखोरांचे टोळके निर्माण झालेले आहे. संघर्ष अटळ असून, त्यांचा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचे परिपत्रक राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाला दोन टप्प्यांत एफआरपी दिली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, ऊसदर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल, तर तो अधिकार केवळ संसदेला आहे; तो राज्यांना दिलेला नाही. असे असताना राज्य सरकार वेगळे परिपत्रक काढू शकत नाही. मुळात केंद्र सरकारच्या ज्या पत्राच्या आधाराने राज्य सरकारने हा शासन निर्णय केलेला आहे. ते पत्र पुन्हा एकदा वाचून पाहावे. त्यात साखर आयुक्‍तांना आकडेमोड करण्याचा अधिकार दिलेला असून, सूत

प्रसिध्द डिझायनर दिग्विजय खाडे यांनी बनविले हुपरी नगरपरिषदेचे बोधचिन्ह.

Image
हुपरी समाचार : हुपरी (वार्ताहर) :  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी हुपरी नगरपरिषदेच्या बोधचिन्हाचे हुपरी नगरपरिषदेच्या वतीने अनावरण करणेत आले. हुपरी नगरीच्या प्रथम नागरीक, नगराध्यक्षा सौ.जयश्री महावीर गाट यांचे हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करणेत आले. हुपरी ही कलारसिकांची नगरी आहे. या नगरीला चांदी उद्योगाबरोबरच कलेची थोर परंपरा आहे. हुपरी नगरपरिषद स्थापनेला चार वर्षे झाली. हुपरी नगरपरिषदेची खास ओळख म्हणून बोधचिन्ह असणे गरजेचे होते. यासाठी हुपरी नगरपरिषदेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये दिग्विजय खाडे यांनी तयार केलेली कलाकृती अव्वल ठरली आहे. बोधचिन्हामध्ये हुपरी नगरीच्या औद्योगिक, कला, आध्यात्मिक परंपरेची ओळख करून देणे आवश्यक होते. हे आव्हान हुपरी परिसर व जिल्ह्यातील नामांकित ग्राफिक डिझायनर दिग्विजय खाडे यांनी लिलया पेलले असून त्यांनी हुपरीची सांस्कृतिक औद्योगिक परंपरा दर्शविणारे सुंदर बोधचिन्ह तयार केले आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून जाहिरात व कला क्षेत्रातील कामाचा अनुभव हा लोगो तयार करताना आलेला आहे. आपल्

शिवराय मनामनांत- शिवजयंती घराघरांत' याची प्रचीती देत शहरा सह अवघा जिल्हा आज शिवमय झाला

Image
हुपरी समाचार : कोल्हापूर  : 'शिवराय मनामनांत- शिवजयंती घराघरांत' याची प्रचीती देत शहरा सह अवघा जिल्हा आज शिवमय झाला. फडफडणारे भगवे ध्वज, भगव्या पताका व रोमांचित करणारी भेदक शाहिरी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येने अनुभवली. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी- जय शिवराय' अशी घोषणा देत शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडावर रवाना झाले. शिवजयंती उद्या (ता. १९) थाटामाटात साजरी करण्यासाठी आठवडाभर शहर परिसरासह जिल्ह्यात तयारी पूर्ण झाली आहे. शिवाजी पेठ व मंगळवार पेठेत वैविध्यपूर्ण कार्यक्रम सुरू असून, चौकाचौकांत उत्सवाचा माहौल आहे. महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर, राजारामपुरी मुख्य रस्ता, ताराबाई रोड, रंकाळा स्टॅंड, गंगावेस, पापाची तिकटी, महापालिका परिसरात भगवे ध्वज, टी शर्ट, पताकांचे स्टॉल्स लागले आहेत. शाहूपुरी, पापाची तिकटी, बापट कॅम्प येथील कुंभार गल्ल्यांत छत्रपती शिवरायांचे पुतळे घेण्यासाठी बालचमूंची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे ऐतिहासिक वेशभूषेत बालचमू अंगणवाडीत आज दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, रणरागिणी ताराराणी, छत्रपती संभाजी महाराज, राज

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

Image
  हुपरी समाचार :  दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी सन 1991 ते 1992 साली तुंगा रतन  विभाग विद्यामंदिर गुळसुंदे येथे शिकत असणारे विद्यार्थी सवणे येथील रॉयल फार्महाउस येथे एकत्र देऊन जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील असंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते विशेषतः मुंबई व अन्य शहरातून मित्र आले होते तुंगा रतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे असणारे तुंगारत्न तीस गावातली मुले तुंगारत्न हायस्कूलमध्ये शिकायला येत असत त्याच्यातील एक आमचा दहावी चा ग्रुप आज 30 वर्षाने रॉयल फार्म हाऊस सवणे येते  एकत्र 13 2 2022 रोजी एकत्र आल्याने सर्वांची चेहरे एकमेकास दिसले असता सर्व विद्यार्थी मित्रांचे मने गेली भारावून  त्यानंतर सर्व वर्ग मित्र एकत्रित बसून सर्व मित्रांचे प्रत्येक वर्गमित्र यास मुलाखती घेऊन त्यांची विचार पुस करण्यात आली व प्रत्येकाला शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच सर्वांनी एकत्रित भोजनाचा लाभ घेतला यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी आमचे दहावीचे वर्गमित् एकत्र आल्यामुले  मन मोकले करण्यात आले तसेच दरवर्षी आपण एक

महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ११५ हरकती आल्या

Image
हुपरी समाचार :   कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ११५ हरकती आल्या आहेत. या हरकतींचा विस्तृत अहवाल पालिकेच्या निवडणूक विभागाने आज रात्री निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठवला. रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयात काम सुरू होते. महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने बहुसदस्यीय ३१ प्रभागांची रचना केली. ही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत दिली होती. चौदा दिवसांमध्ये ११५ हरकती आल्या. बहुतांशी हरकती हद्दीबाबत होत्या. रचना करताना भौगोलिक संलग्नता राखली गेली नसल्याचा आक्षेप बहुतांश जणांनी घेतला आहे. दोन दिवसांपासून हरकतींचा अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काम करण्यात येऊन मध्यरात्री अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरूवारी (ता. २४) या हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर सुनावणीचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्यानंतर ४ मार्चला अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल, अशी म

हूपरीत भाजप मध्ये फूट पडण्याची जोरदार शक्यता...?

Image
हुपरी समाचार : हुपरी : काही दिवसांपासून हुपरी नगरपरिषद भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडी व इतर अनेक बाबींमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब शेंडूरे व भाजपाचे काही कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही , अशी भावना आहे . त्यामुळे अंतर्गत खदखद दिसून येत आहे . त्यामुळे त्याचे पडसाद हुपरी पालिका राजकारणात पडणार आहेत . सध्या हुपरी नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षासह भाजपची सत्ता आहे .  हुपरी व परिसरात राजकीय घडामोडीत भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून पद भूषविणारे उद्योगपती महावीर गाट यांची हुपरी नगरपरिषदेवर कमांड आहे . पहिल्या गाट हुपरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महावीर यांच्या अतोनात प्रयत्नामुळे भाजपाला उल्लेखनीय यश मिळाले . प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून सौ . जयश्री गाट विराजमान झाले  . हुपरीच्या सत्तेच्या राजकारणात भाजपाची दमदार  इंट्री झाली नेते ,यामध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत असणारे नेते .जनता समूहाचे आण्णासो शेंडूरे यांचेही योगदान आहे .  मात्र वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेत असे ठरले होते की जिल्हा परिषदमध्ये ज्येष्ठ नेते आण्णासो शेंडूरे यांनी आपले किंवा आपल्या सं

कळंबा सातारा कारागृहातील कैदी लुटत आहेत कोरोनाच्या सुट्टीची मजा

Image
हुपरी समाचार :   कळंबा कारागृहातील 104 आणि सातारा कारागृहातील 110 कैदी कोरोनाच्या सुट्टीची मजा लुटत असून, त्यांपैकी काहीजण जबरी चोरी आणि हाणामारीच्या गुन्ह्यांत सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना कारागृह प्रशासनाकडून केव्हा बोलावणे येणार, याची पोलीस आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्याच क्षेत्राला जबर फटका बसला. महाराष्ट्रभर नोकरीच्या निमित्ताने गेलेले चाकरमानी आपआपल्या घरी परतले होते. यातून कारागृहातील बंदिवानही अपवाद राहिले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटांमध्ये कारागृहातील अनेक कैदी कोरोनाबाधित आढळून आले. दाटीवाटीने असलेल्या कैद्यांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना आपआपल्या घरी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक बंदिवान कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांतील 104 बंदिवानांना कोरोना काळात घरी सोडण्यात आले, तर सातारा कारागृहातील 110 बंदिवानांनाही सोडून देण्यात आले होते. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे या कैद्यांना कारागृह प्रशासनाने परत बोलाविणे गरजेचे आहे. कारण यांतील काहीजण पुन्हा गुन्ह

२१ कोटी चा थकीत घरफाळा बड्या आसामींचा..

Image
दैनिक हुपरी समाचार : कोल्हापूर  : शहरातील ५० जणांनी महापालिकेचा सुमारे २१ कोटी ३७ लाख ५३ हजार ५७६ रुपयांचा घरफाळा थकवला आहे. यामध्ये काही बड्या आसामीं सह, बँका, वित्तीय संस्था, शिक्षण संस्थांचाही समावेश आहे. महापालिकेची एकूण थकबाकी ३५ कोटी रुपयांची असून, त्यातील २१ कोटी या बड्या आसामींची आहेत. प्रशासनाने ही रक्कम वसूल केली तर उर्वरित थकबाकी वसूल होणे अवघड नाही जकात, एल.बी.टी. रद्द झाल्यानंतर घरफाळा आणि पाणीपट्टी हेच महापालिका उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत आहेत. मात्र, तरीही घरफाळा वसुलीसाठी प्रशासनाकडून अद्याप युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील घरफाळ्याचा आढावा घेतला असता महापालिकेला ८५ कोटी रुपयांचा घरफाळा जमा होणे अपेक्षित आहे. त्यातील ५१ कोटी वसूल झाले असून, ३५ कोटी रुपयांच्या घरफाळ्याची वसुली अद्याप बाकी आहे. घरफाळा थकवणाऱ्यांची एक यादी महापालिकेकडे आहे. यामध्ये ५० मिळकतधारक आहेत. त्यांनी सुमारे २१ कोटी ३७ लाख ५३ हजार ५७६ रुपयांचा घरफाळा थकवला. यामध्ये काही बडे व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षण संस्था, दवाखाने यांचा समावेश आहे. काही मिळकतधारक राजकीय छत्रछायेखाली

जयप्रभा स्टुडिओ जागा विक्री प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळा तर्फे आज कोल्हापुरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले

Image
तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार मागे हटणार नाही असा इशारा स्वप्निल राजशेखर यांनी दिला. दैनिक हुपरी समाचार :  कोल्हापूर :  गेले कित्येक वर्ष आमचे श्रध्दास्थान बंद आहे. ही वास्तु ओसाड पडलीय. जो पर्यंत कोल्हापूरची अस्मिता आहे तो पर्यंत ही वास्तू फक्त कलेला वाहीलेली असावी. चित्रीकरण सुरु रहावे.  अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळा तर्फे आणि कोल्हापूरकरांची आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी व्यक्त केली. आज साखळी उपोषणात ते सहभागी झाले आहेत. जयप्रभा स्टुडिओ जागा विक्री प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळा तर्फे आज कोल्हापुरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात महामंडळाचे संचालक, सभासद, ज्येष्ठ कलावंत या उपोषणाला बसले आहेत. यावेळी स्वप्निल राजशेखर म्हणाले, माझ्या वडिलांनी (राजशेखर) २० वर्षापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते या वास्तूवर जर बुलडोझर फिरवला तर मी आत्मदहन करेन आणि आज २० वर्षानंतर आम्ही हेच आंदोलन पुढे चालू ठेवले आहे. तरी आमच्या प्रयत्नाला म्हणावे तसे यश नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मात्र, यावेळी कोल्हापूरकरांनी,कलाकारांनी ठाम निर्णय

प्रशासनाने पुनर्वसन कायद्याचे पालन करावे. कायदेशीर बाबीनुसार पुनर्वसन करावे; अन्यथा धरणाचे काम करू देणार नाही

Image
  दैनिक हुपरी समाचार : आजरा  : प्रशासनाने पुनर्वसन कायद्याचे पालन करावे. कायदेशीर बाबीनुसार पुनर्वसन करावे; अन्यथा धरणाचे काम करू देणार नाही, असा इशारा उचंगी प्रकल्पग्रस्तांनी आज प्रशासनाला दिला. पुनर्वसनाची खोटी कागदपत्रे करून धरणग्रस्तांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आजरा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून केली आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांना दिले. तहसीलदार विकास अहिर उपस्थित होते. राज्य धरणग्रस्त व प्रकल्प परिषदेच्या वतीने मोर्चा झाला. येथील भाजी मंडईपासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. आधी पुनर्वसन मग धरण, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सभेत संजय तर्डेकर म्हणाले, 'पुनर्वसन कायद्यानुसार २००९ ला अद्ययावत संकलन रजिस्टर तयार केले होते. त्यानुसार १२० प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप केले. पुनर्वसन कायद्यानुसार ही प्रक्रिया झाल्याने प्रकल्पग्रस्त समाधानी होते; पण त्यानंतर २०१३ नवीन संकलन रजिस्टर केले. पूर्वीचे संकलन रजिस्टर खोटे अस

पै.मयुर जाधव मल्लविद्या किताबाचा मानकरी

Image
मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा 2022 दैनिक हुपरी समाचार :  तीन वर्षापुर्वी मल्लविद्या कुस्ती केंद्राची स्थापना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत झाली.याठिकाणी माती व गादी विभागावर दररोज कुस्ती मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय पदकाकडे वाटचाल सुरु आहे.कुस्ती केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. *विशेष सन्मान*...   कुस्ती स्पर्धेदरम्यान १९६४ चे आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा) , कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पै.गणेश मानुगडे (भाऊ) आणि भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष , पोलीस उपनिरीक्षक मा.डी.आर.जाधव (आण्णा) या मान्यवरांचा विशेष सन्मान कण्यात आला. *पुरस्कार प्रदान सोहळा*....  आदर्श वस्ताद पुरस्कार शित्तुर गावचे वस्ताद पै.आनंदा भोसले मामा , आदर्श कुस्तीप्रेमी पुरस्कार शेडगेवाडी गावचे मा.दिनकर शेडगे नाना , मल्लविद्या कुस्ती भुषण पुरस्कार पै.आनंदा मुळीक भाऊ , आदर्श कुस्ती संघटक पुरस्कार पै.नाना गायकवाड या मान्यवरांना कुस्ती क्षेञातील उल्लेखनीय कार्याबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतिने पुरस्कार प्रदान करून सन

जागा नसेल तर ती उपलब्‍ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने काय केले ?

Image
दैनिक हुपरी समाचार :   कोल्‍हापूर  : ग्रामीण भागासाठी ३० हजार लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक आहे. २०२१ च्या लोकसंख्येचा विचार करता अजूनही २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असून त्याला यापूर्वीच मंजुरीही दिली आहे; मात्र यातील १० आरोग्य केंद्रांसाठी जागाच नसल्याने त्यांचे बांधकाम झालेले नाही. महत्त्‍वा‍चे म्‍हणजे काही पीएचसींना तर १९९७ ला म्‍हणजेच २५ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. केवळ, जागा नाही एवढेच कारण आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मग जागा नसेल तर ती उपलब्‍ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने काय केले ? अन्य गावात या आरोग्य संस्‍थांची उभारणी का केली नाही? असे अनेक प्रश्‍‍न उपस्थित आहेत. दोन वर्षापासून आलेले कोरोनाचे संकट, त्याच्याशी सामना करताना प्रशासनाची व आरोग्य विभागाची झालेली दमछाक, याचबरोबर महापुराच्या काळात तयार होणारे आरोग्याचे प्रश्‍‍न, साथीचे रोग याचा विचार करता सक्षम आरोग्य यंत्रणेचे महत्त्‍‍व अधोरेखित झाले आहे. यासाठीच आरोग्यच्या पायाभूत सुविधा भक्‍कम असणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या नियमानुसार ज्या गावात ही पीएचसी मंजूर झाली आहे, त्याच ठिकाण

जयसिंगपूर : समृध्दी इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग

Image
तब्बल २१ मुले व मुली अडकल्याने एकच धावपळ उडाली. दैनिक हुपरी समाचार :  जयसिंगपूर : येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव बँकेलगत असलेल्या समृध्दी इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली. या दुकानावर असलेल्या फिनिक्स इन्फोटेकमध्ये तब्बल २१ मुले व मुली अडकल्याने एकच धावपळ उडाली. मोठ्याप्रमाणात धुराच्या लोट निघत असल्याने मुलांना श्वसन करण्यास अडथळा निर्माण झाल्याने भियभित अवस्थेत मुलांनी आरडाओरडा केली. अखेर पालिकेच्या अग्निशमन दलाने पाचारण केल्यानंतर या २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनानेने जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली होती.  याबाबत अधिक माहिती अशी, सांगली-कोल्हापूर महामार्गावर पोलिस स्टेशनच्या समोर समृध्दी इलेक्ट्रीकचे दुकान आहे. दुकान मालक हे सोमवारी दुपारी १ च्या सुमारास दुकान बंद करून जेवण्यासाठी घरी गेले होते. अशातच शॉर्ट सर्किटने दुकानाला आग लागली. दुकानात इलेक्ट्रीक व प्लॉस्टिक साहित्य असल्याने आगीबरोबरच मोठ्याप्रमाणात धुराचे लोट बाहेर निघत होते. या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर फिनिक्स इन्फोटेक्सचे क्लास

आमदार नितेश राणे यांना उपचारांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आलं

Image
दैनिक हुपरी समाचार :   कोल्हापूर :  आमदार नितेश राणे संतोष परब हल्लाप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना अधिक तपासासाठी कोल्हापूरला नेण्यात येण्यापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सिंधुदुर्ग येथे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांना कोल्हापूरला नेत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच थांबवून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर ही रुग्णवाहिका आता कोल्हापुरात पोहोचली असून त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक नाते होते..

Image
  दैनिक हुपरी समाचार : कोल्हापूर:  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक नाते होते. लतादीदींची कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जयप्रभा स्टुडिओ व पन्हाळ्यातील बंगला यामुळे त्यांचे लहानपण बहुतांशी वास्तव्य कोल्हापुरातच गेले.  कोल्हापुरात लतादीदी साडी, दागिने, खाण्याचे पदार्थ खरेदीची हौस पूर्ण करणारी काही खास ठिकाणे होती. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून लतादीदी पार्सल मागवून घ्यायच्या. लतादीदींचे स्नेही श्रीकांत डिग्रजकर यांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला आहे. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून पार्सल लतादीदी मागवून घ्यायच्या. वर्षातून दोन साड्या याच दुकानातून खरेदी करत लतादीदींना कोल्हापूरातून साडी खरेदी करणे फार आवडत होते. त्या विशेषत: पांढऱ्याशुभ्र, दुधी, क्रिम अशा रंगांच्या साड्यांना पसंती देत. बहुधा त्यांच्या आवडीचे हे रंग असावेत. कोल्हापुरातील (kolhapur) महादवार रोडवरील पोरे ब्रदर्स यांच्या साडी दुकानात लतादीदींची हमखास साडीची खरेदी ठरलेली असयाची. त्याकाळात

गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले

Image
  दैनिक हुपरी समा.चार : गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. मागील एक महिन्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काल (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. Lata Mangeshkar : भारत सरकारचे पुरस्कार 1969 ः पद्मभूषण 1989 ः दादासाहेब फाळके पुरस्कार 1999 ः पद्मविभूषण 2001 ः भारतरत्न राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1972 ः 'परी'मधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार 1974 ः 'कोरा कागज' मधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1990 ः लेकिन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार : 1959 ः आजा रे परदेशी (मधुमती) 1963 ः कहीं दीप जले (बीस साल बाद) 1966 ः तुमही मेरे मंदिर (खानदान) 1970 ः आप मुझे अच्छे (जीने की राह) 1993 - फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 1994 ः दीदी तेरा देवर दिवाना (हम आपके हैं कौन) साठी विशेष पुरस्कार 2

प्लॅस्टिक कॅपिंगच्या विल्हेवाटीची जबाबदारी उत्पादक कंपन्यांवर...

Image
  दैनिक हुपरी समाचार : मुंबई :  स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी अनेक उपाययोजना करणाऱया पालिकेने आता प्लॅस्टिक कॅपिंगच्या विल्हेवाटीची जबाबदारी खाद्यपदार्थ, विविध पेये बनवणाऱया कंपन्यांनाच देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी मुंबईत विविध मार्गाने निर्माण होणारा प्लॅस्टिक आणि वेस्टनांचा कचरा, उत्पादक कंपन्या, विल्हेवाटीच्या पद्धती, प्रमाण याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेत प्लॅस्टिक कचरा, वेस्टनांच्या विघटनासाठी उत्पादकांची व्यवस्था नसेल तर पालिकेच्या कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी निधी पुरवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱयाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱयाचे वर्गीकरण, ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱयाची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याच

बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे महानगरपालिका राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून जाणार

Image
दैनिक हुपरी समाचार :   कोल्हापूर  : बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे महानगरपालिका राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे काही जणांचा अपवाद सोडल्यास अपक्षांना निवडून येण्याची संधी फार कमी दिसते. त्यामुळे शहरातील पक्षीय राजकारणाला पूरक अशी परिस्थिती आहे. पहिल्यांदाच बनवलेल्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आगामी निवडणूक रंगतदार होईल. पूर्वी एक प्रभाग हा तीन ते पाच हजार लोकसंख्येचा होता. त्यामुळे विजयाची काही समीकरणे पक्की झाली होती. गठ्ठा मतदानाची बेगमी झाली, की विजय निश्चित असायचा. परिसरातील मंडळे, महिला बचत गट, तालमी यांना सांभाळले की राजकारण करता येत होते. त्यातून शहरात अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढत गेली. ही संख्या इतकी वाढली, की महापालिकेची निवडणूक पक्षाला डावलून आघाड्यांत होऊ लागली. त्यातूनच ताराराणी आघाडीचा प्रयोग झाला. सहा ते अडीच महिन्यांचे महापौर बनले. २०१० ला महापालिकेत पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. तरीही काही अपक्ष निवडून यायचे आणि पदाधिकारी निवडीवेळी आपले उपद्रवमूल्य दाखवायचे. बहुसदस्यीय प्रभागांचा विस्तार पाहता अपक्ष उमेदवारांना निवडून येणे अवघड आहे. अपक्ष उम