हुपरी शहराच्या अस्मितेसाठी आमरण उपोषण व बेमुदत गावबंद आंदोलन! :- मा. प्रतापराव जाधव


हुपरी समाचार :

     *हुपरी :  ‘आपला हा संघर्ष गेली चार वर्ष सुरु असून परिसराती दहा गावांना रोजीरोटी देणाऱ्या हुपरी शहराच्या अस्मितेचा हा प्रश्न असून त्यासाठी मरण आले तरी‌ माघार घेणार नाही,’ असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे हुपरी शहराध्यक्ष मा. प्रतापराव जाधव यांना केले. ते ‘चतुर्थ वार्षिक कर आकारणी’ संबधी मा.पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांना कॉंग्रेस कमिटी मार्फत देण्यात आलेल्या निवेदनानुसार मंगळवार दि. ०१ मार्च २०२२ रोजी आमरण उपोषण आंदोलन व गुरुवार दि. ०३ मार्च, २०२२ रोजी पासून पुकारलेल्या बेमुदत गावबंद आंदोलनाची माहिती देत होते. हुपरी नगरपरिषदेने इतर नगरपरिषदांपेक्षा अडीचपट जास्त कर आकारणी केली असून त्यानुसार मिळणाऱ्या महसुलातून आवश्यक सुविधा सुद्धा पुरवण्यास हे प्रशासन व  सत्ताधारी असफल झाले आहेत. त्यामुळे शासनाने कर आकारणी संदर्भात २०१९ मध्ये जे राजपत्र जारी केले आहे त्यानुसार कर आकारणी करावी व शहरातील जवळ जवळ तीन ते चार हजार मालमत्तांची नोंदनी न केल्याने नगरपरिषदचे झालेले गेल्या चार वर्षाचे महसूलीचे नुकसान भरपाई द्यावी आणि चतुर्थ वार्षिक कर आकारणी शासन आदेशानुसार करुन नगरपरिषदला मिळणारे शासकीय अनुदान नियमित करावे यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने संघर्ष करत आहोत. या आंदोलन सफल करुन शहरातील पाणीप्रश्न निकालात निघणार आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्यांच्या जमीनी व घरे स्वतःच्या नावावर होऊन मिळणार आहेत, त्यांना बँकांमधुन योग्य कर्ज पुरवठा मिळणार आहे तसेच शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होणार असून यामुळे शहराची प्रगती होऊन शहराचा लौकिक वाढणार आहे.’ असेही मा. प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले.*

         *यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. मानसिंगराव देसाई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हातकणंगले तालुका उपाध्यक्ष मा. किरणराव पोतदार, तालुका उपाध्यक्ष मा. बाळासाहेब जाधव, शहर कार्याध्यक्षा मा. सज्जनराव चव्हाण, शहर सचिव मा. किरण भोसले, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष मा. अशोक खाडे, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष मा. धर्मवीर कांबळे, शहर युवक अध्यक्ष मा. अरिहंत बल्लोळे, शहर युवक उपाध्यक्ष मा. शब्बीर कलावंत, शहर अल्पसंख्यक कमिटी अध्यक्ष मा. सोहेल शिकलगार, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष मा.प्रणीत मधाळे, कॉंग्रेस सेवा दल शहराध्यक्ष मा. प्रशांत जाधव, शहर कार्यकारिणी सदस्य मा. रविंद्र कांबळे, दलित महासंघ तालुका अध्यक्ष मा. सुनिल कोरे, कॉंग्रेस असंघटीत कामगार संघटनेचे हुपरी शहराध्यक्ष मा. अनिल म्हातुगडे, युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रवीण सनदे, कॉंग्रेस शहर कमिटी सदस्य हसरत कांबळे,कॉंग्रेस शहर कमिटी सदस्य चंद्रकांत परकारे युवक कार्यकर्ते रोहित कांबळे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post