हूपरीत भाजप मध्ये फूट पडण्याची जोरदार शक्यता...?


हुपरी समाचार :

हुपरी : काही दिवसांपासून हुपरी नगरपरिषद भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडी व इतर अनेक बाबींमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब शेंडूरे व भाजपाचे काही कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही , अशी भावना आहे . त्यामुळे अंतर्गत खदखद दिसून येत आहे . त्यामुळे त्याचे पडसाद हुपरी पालिका राजकारणात पडणार आहेत . सध्या हुपरी नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षासह भाजपची सत्ता आहे . 


हुपरी व परिसरात राजकीय घडामोडीत भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून पद भूषविणारे उद्योगपती महावीर गाट यांची हुपरी नगरपरिषदेवर कमांड आहे . पहिल्या गाट हुपरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महावीर यांच्या अतोनात प्रयत्नामुळे भाजपाला उल्लेखनीय यश मिळाले . प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून सौ . जयश्री गाट विराजमान झाले  . हुपरीच्या सत्तेच्या राजकारणात भाजपाची दमदार  इंट्री झाली नेते ,यामध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत असणारे नेते .जनता समूहाचे आण्णासो शेंडूरे यांचेही योगदान आहे .

 मात्र वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेत असे ठरले होते की जिल्हा परिषदमध्ये ज्येष्ठ नेते आण्णासो शेंडूरे यांनी आपले किंवा आपल्या संबंधित व्यक्तीला  निवडून देऊन अनायेचे आहे. व हुपरी नगरपरिषदेमध्ये ज्येष्ठ नेते महावीर गाट यांनी   निष्ठावंत , निःस्वार्थी उमेदवारांना उमेदवारी देऊन निवडून आणायचे आहे . असे असताना  कोणत्याही ठिकाणी सत्तास्थानी असणाऱ्यांनाच झुकते माप दिले जाते , त्याप्रमाणे हुपरी नगरपरिषद भाजपा प्रभारी , माजी आमदार  सुरेश हाळवणकर व जिल्हा कार्यकारणीकडून सत्ताधारी भाजपा गटालांच प्राधान्य दिले जाते . पक्षात आपल्याला सन्मान दिला जात नाही , आपल्याला डावलले जाते ही खदखद बऱ्याच दिवसांपासून शेंडूरे व भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे . या असंतोषाचा स्फोट लवकरच होणार आहे , अशी शहरात चर्चा सुरू आहे . तसे झाल्यास भाजपासाठी  तो राजकीय भूकंप ठरणार आहे .  दरम्यान , नाराज झालेले भाजपा नेते कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार काय ? आपला सवतासुभा मांडणार ? हे येणारा काळच ठरविणार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post