महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ११५ हरकती आल्या


हुपरी समाचार :

 कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ११५ हरकती आल्या आहेत. या हरकतींचा विस्तृत अहवाल पालिकेच्या निवडणूक विभागाने आज रात्री निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठवला.रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयात काम सुरू होते.


महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने बहुसदस्यीय ३१ प्रभागांची रचना केली. ही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत दिली होती. चौदा दिवसांमध्ये ११५ हरकती आल्या. बहुतांशी हरकती हद्दीबाबत होत्या. रचना करताना भौगोलिक संलग्नता राखली गेली नसल्याचा आक्षेप बहुतांश जणांनी घेतला आहे.

दोन दिवसांपासून हरकतींचा अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काम करण्यात येऊन मध्यरात्री अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरूवारी (ता. २४) या हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर सुनावणीचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्यानंतर ४ मार्चला अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post