आमदार नितेश राणे यांना उपचारांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आलंदैनिक हुपरी समाचार :

 कोल्हापूर : आमदार नितेश राणे संतोष परब हल्लाप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना अधिक तपासासाठी कोल्हापूरला नेण्यात येण्यापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सिंधुदुर्ग येथे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

त्यानंतर आज त्यांना कोल्हापूरला नेत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच थांबवून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर ही रुग्णवाहिका आता कोल्हापुरात पोहोचली असून त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post