मनसे मराठी कामगार सेनेला यश
हुपरी समाचार :
मनसे मराठी कामगार सेनेला यश आयजीएम सफाई कामगारांच्या मागणीला मनसे मिळवून दिले यश इचलकरंजी येथील आयजीयम मधील सफाई कर्मचाऱ्यांना अखेर सात महिन्यांचा हक्काचा किमान वेतनातील फरक सोमवार हातात पडला 27 कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला १ मे ते १८ फेब्रुवारी पर्यंतचा फरक मिळाला त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.
याचे नेतृत्व मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर,मनसे शहर अध्यक्ष प्रतापराव पाटील, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी, सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे चर्चच्या फेऱ्या सुरू होत्या मात्र तोडगा निघत नव्हता सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर कंपनीकडून थकीत पगार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या सोमवारी कंपनीने आयजीयम प्रशासनाकडे थकित पगारापोटीचे धनादेश जमा केले दुपारी चार वाजता,सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव व सहकार सेना राज्य उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव याच्या हस्ते धनादेश कर्मचाऱ्यांना वितरित केले या वेळ उपजिल्हाध्यक्ष रवि गोंदकर शहर अध्यक्ष प्रतापराव पाटील उपतालुकाअध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, मनसे मराठी कामगार सेना तालुकाअध्यक्ष महेश शेंडे उपजिल्हाध्यक्ष योगेश दाभोळकर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर*