हुपरी समाचार :
इस्लामपूर :आंधळी येथील श्री.दत्त एज्युकेशन सोसायटीअंकलखोप संचलित हिंदकेसरी गणपतरावआंधळकर हायस्कूल आंधळीमध्ये 'माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या मध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियानाचे महत्त्व सांगून तिचे रक्षण करण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून शपथही घेणेत आली.यावेळी वैदही माने,धनश्री माने व प्रदुम्न गोसावी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर सरपंच अमित चव्हाण व उपसरपंच माणिक माने यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे संयोजनआर.आर गायकवाड, एम.एन.माने,आर.एम.खामकर , ए.ए.पाटील,डी.व्ही.बंडगर पी.पी.पाटील,एस.एस.कांबळे,यु.बी.शिंदे , बी.एच.जाधव, राजाराम जाधव व हिम्मत शिंदे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन डी.सी.चौधरी यांनी तर आभार एस.पी.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष विष्णु माने,सचिव नरेंद्र पाटील व संचालक नानासो माने,यशवंत माने यांनी सर्वांचे अभिनंदन केले.