सोमय्या आणि पोलिस यांच्यात वादावादी ..

नोटिस घेण्यास सोमय्यांनी नकार दिला.  


 मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने जात असताना त्यांना कशेडी घाटात पोलीसांना अडविले.यावेळी सोमय्या आणि पोलिस यांच्यात वादावादी झाली. यावेळी नोटिस घेण्यास सोमय्यांनी नकार दिला. ते दापोलीच्या दिशेने रवाना झाले.

''माफिया सरकारच्या पोलीसांनी मला रत्नागिरी जिल्हा प्रवेशावर (खेड सिमेवर) नोटीस दिली. CRZ मधील अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट तुटल्यावर बेरोजगारी होणार आहे, माझ्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार, म्हणून मी दापोली जावू नये, असे पोलिसांनी म्हटलं आहे. "मी दापोली जात आहे, थांबणार नाही,'' असे पोलिसांनी सांगितले.

परब यांचा रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ''हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, अटक करुन दाखवा,'' असे आव्हान सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. ''उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून वाचलो,'' असे सोमय्या म्हणाले होते.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी सांगितले आहे. हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट व ही जागा अनिल परब यांनी सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांत विकली, व करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणी करीता अर्ज केला आहे, असे सोमय्यांनी सांगितले.''सत्यासाठी हा आग्रह आहे, हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. दोन रिसॉर्ट आहे, एकावरच कारवाई तर दुसऱ्यावर का नाही. ठाकरे पोलिसांना नाचवतात, पोलिस जनतेचे आहेत, सगळे माफिया आहे, वसुलीवाले आहेत,'' असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post