Posts

Showing posts from April, 2022

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे हार घालून जंगी स्वागत करताना हूपरी गावचे मनसे नगरसेवक श्री दौलतराव पाटील आण्णा

Image
  हुपरी समाचार ऑनलाइन :  हुपरी : मा.श्री हिंदू सम्राट व मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे हार घालून  जंगी स्वागत करताना हूपरी गावचे मनसे नगरसेवक श्री दौलतराव पाटील आण्णा व कोल्हापूरचे नगरसेवक मा श्री राजू दादा दिंडौले व त्यांचे  असंख्य कार्यकर्ते ..            छत्रपती शिवराय मनामनात..              शिवजयंती घराघरात...  हुपरी शहर भगवा रक्षक सघंटना,व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने घरोघरी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अकराशे मुर्ती व एक परमपूज्य भगवा ध्वज* शिवभक्त नागरीकांना प्रदान करण्यात येणार आहेत. जेणेकरून घरोघरी शिवमहोत्सव हा सण साजरा झाला पाहिजे. हा शुभारंभ आज करण्यात आला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे .. आपला-  महाराष्ट्र नवनिर्माण सेना,भगवा रक्षक सघंटना,स्वामी समर्थ केबल नेटवर्क हुपरी

एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये सभा

Image
हुपरी समाचार  ऑनलाइन : मुंबई :  एक मे रोजी  राज ठाकरे    यांची औरंगाबाद मध्ये सभा आहे. या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन तारखेला नाशिकला जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादचा दौरा आटपून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे आपल्या या दौऱ्यात मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता आहे. अनंता सूर्यवंशी यांचे निधन झाले आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राज ठाकरे नाशिक मार्गे मुंबईला रवाना होतील. दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादला दाखल होणार आहेत. उद्या राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेपूर्वी ते आज मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, तसेच सभेच्या तयारीचा देखील आढावा घेणार आहेत. औरंगाबादमध्ये मनसेची जय्यत तयारी उद्या एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी मिळणार की नाही असा देखील प्रश्न होता. मा

चला संभाजीनगर... 1 मे महाराष्ट्र दिन.. ऐतिहासिक राज सभा....

Image
हपरी समाचार लाईव्ह संभाजीनगर येथे 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळ च्या मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले... यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते नितीन सरदेसाई,मनसे नेते शिरीष सावंत, मनसे नेते अविनाश अभंयकर,मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,सरचिटणीस संदीप देशपांडे इत्यादी उपस्थित होते...

जागतिक पुस्तक दिन

Image
  हुपरी समाचार :      दरवर्षी २३ एप्रिलला शंभरहून अधिक देशात साजरा होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनाचे २०२२ रौप्य महोत्सवी वर्ष आहे. औपचारिक दृष्ट्या २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी १९२३ पासून पुस्तक दिन ही कल्पना राबवली जाते.      २३ एप्रिल १९२३ ला स्पेनमध्ये मिगुएल सर्वेंटीस च्या स्मृतीसाठी पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा करण्यात आला. इंग्लंड मध्ये मार्च महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. ३८ नाटके लिहणारा विल्यम शेक्सपियर याचा जन्म व मृत्यू दिवस २३ एप्रिल आहे. इंका गार्सिलोसा, सर्व्हेंटीस, विल्यम वर्डस्वर्थ ब्लादिमिर नाबोकाव यांचा ही स्मृतीदिन २३ एप्रिल आहे. युनेस्को  (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) म्हणजे मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांनी १९९५ ला २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन व कॉपी राईट दिन म्हणून मान्य केला. १९९५ ला युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या सर्व साधारण सभेत वाचन आवड व लेखक सन्मान करण्यासाठी या दिवसाला मान्यता देण्यात आली. वाचनाची आवड, लेखक व पुस्तकांचा सन्मान ही संकल्पना आहे. वाचन, लेखन, प्रकाशन, पुरस्

राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी महिन्यातून एक तास वेळ द्यावा गावपातळीवर एकत्रित पणे चर्चा करावी: ना. जयंत पाटील

Image
हुपरी समाचार : इस्लामपूर :  रेड (ता. शिराळा) येथे आज शिराळा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता परिवार संवाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतरावजी पाटीलसाहेब यांच्या उपस्थित पार पडली. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार मतदार संघातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष, मंत्री मा. ना. पाटीलसाहेब यांनी मार्गदर्शन केले. थेट कार्यकर्त्यांशी सवांद साधला. त्यांचे शंका समाधान केले. गावपातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. अडचणी सोडविण्याबाबतचे उपाय योजना सांगितल्या.  यावेळी बोलताना मंत्री पाटीलसाहेब म्हणाले, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी महिन्यातून एक तास वेळ द्यावा. गावपातळीवर एकत्रित चर्चा करावी. बूथ कमिटी निहाय समित्यांच्या बैठका घ्याव्यात. प्रत्येक गावात राष्ट्रवादी सक्षम करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आपणाला येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्ष्याचे दोनशे आमदार निवडून आणावयाचे आहेत. सध्या प्रत्येक वस्तूच्या वाढत चाललेल्या महागाई बाबत न

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढाविण्या साठी शालेय स्तरावरील बक्षिस योजना प्रेरणादायी ठरतील : अजित कदम

Image
हुपरी समाचार : इस्लामपूर :  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्याना प्रेरणा मिळावी त्याची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने शालेय स्तरावर सुरू केलेली बक्षिस योजना इतरांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित कदम यांनी व्यक्त केला ते नव महाराष्ट्र विद्यालय, चितळी ता खटाव येथे कै. मा. प्राचार्य तुकाराम ज्ञानू कदम चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.श्रीमती शेवंताबाई ज्ञानू कदम व कै. श्री. ज्ञानू सिताराम कदम यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या बक्षीस योजनेच्या बक्षीस समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .  यावेळी विद्यालया तील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत च्या प्रथम 3   क्रमांक मिळवविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना मुख्याध्यापक जी.ए .साठे म्हणाले विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते  प्रयत्न करत आहेत त्यामुळेच 8 वी शिष्यवृत्ती व सारथी एन.एम .एम.एस शिष्यवृत्ती ,संस्थेच्या निबंध, चित्रकला या विभाग स्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. या कार्यक्रमाला सरप

भेट लाखमोलाची.... आण्णांच्या वाढदिवसाची...

Image
हुपरी समाचार : हुपरी : १८ एप्रिल या दिवशी आमचे मार्गदर्शक व हुपरी नगरीचे धडाकेबाज नेते, नगरसेवक  मा.दौलतराव पाटील-आण्णा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आण्णांच्या सुविद्य पत्नी व आमच्या वहिनी मा.सौ.गीतांजली दौलतराव पाटील यांनी आमच्या जय भवानी भगवा रक्षक संकष्टी अन्नछत्र मंडळ, हुपरीया प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या अन्नछत्र मंडळास *महाप्रसाद जेवणाची भांडी व साहित्य भेट दिली आहेत.त्याबद्दल सौ.वहिनीसाहेब व पाटील परिवाराचे आम्ही हार्दिक आभारी आहोत. श्री.अंबाबाई मंदिर प्रांगणात ही भांडी व साहित्य भेट देणेत आली यावेळी सौ.गीतांजली दौलतराव पाटील,नम्रता वसंतराव पाटील, रेशमा प्रशांत पाटील, संगिता राजू पाटील, शैला रमेश पाटील,पूनम सूर्याजी पाटील, साक्षी सुनिल पाटील, मीनाक्षी राहुल मोरबाळे, सुनिता राजेश मोरबाळे,अनिता सुरेश पाटील, कमल भरत पाटील, सुनिता सुभाष पाटील, वंदना पाटील, पूर्वा पाटील, सिंधू मोरबाळे आदि महिला उपस्थित होत.

राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता

Image
हुपरी समाचार : मुंबई :   राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचीचर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि मनसे युतीच्या  चर्चा सुरु आहे. भाजपला साथ देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि मनपा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची चर्चा सुरु आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. त्याला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप मनसे युती झाली तर त्यांना मुंबईसह ठाण्यात टक्कर देणे शिवसेनेला एकट्याला कठीण जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची साथ घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद फारशी नसली तरी ठाणे, पुणे, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला फायदा होईल, असा अंदाज शिवसेना नेत्यांचा आहे.

चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी पण सोबत जाणार...जयंत पाटील

Image
हुपरी समाचार :   चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी पण सोबत जाणार, कारण उन्हाळा येतोय... भला माणूस आहे... माझ्या ओळखीचे आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. मुंबईमध्ये मनसेसोबत आघाडी केली तर त्याचा फटका भाजपला बसेल, असेही पाटील म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते. संवाद यात्रा 230 मतदार संघात फिरलो. आम्ही लढवत नव्हतो तिथं सुद्धा स्वागत झालं आहे. आम्हाला बऱ्याच ठिकाणी सुधारणा करयची गरज आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. भोंगे उतरवताना गुजरात अथवा इतर राज्यात काय परिस्थीती पाहावी, असा टोला जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरे सर्वांचं लक्ष वेधत आहेत. राज ठाकरे कोणाच्या हातचं भावल झालेत. नकलाकार आहेत त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार त्यांचं कौतुक करतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कामगिरीवरही त्यांनी वक्तव्य केले. सातारा जिल्हयात थोडी पडझड झाली आहे. साताऱ्यात एकटं जायचं की वेगळं लढायचं? याचा निर्णय शरद पवार घेतील, असे जयंत पाटील म्हणाले. अर्धवट राहिलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

Image
  सून चंपा सून तारा…कोई जिता कोई हिमालय मे गया... संध्या सव्वालाखे   . हुपरी समाचार : पुणे  : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा तब्बल 18,901 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा देखील मान मिळवलाय. संपुर्ण राज्याचं लक्ष असलेल्या या निवडणूक निकालानंतर आता राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. निवडणूक हारलो तर हिमालयात जाईल, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. अशातच आता महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी व्हिडीओ शेअर करत चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे. सून चंपा सून तारा…कोई जिता कोई हिमालय मे गया, असं ट्विट संध्या सव्वालाखे यांनी केलं आहे. भाजपची धूळधाण करत कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील जयश्री जाधव यांचा ऐतिहासिक विजय हा प्रत्येक कोल्हापूरकराचा विजय आहे, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान,

या निवडणूकीत आपला राजकीय दबदबा सिध्द करून पालकमंत्री पाटील यांनी चंद्रकांतदादांचा करेक्ट कार्यक्रम केला

Image
हुपरी समाचार :  कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे या निवडणूकीत जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम हे उमेदवार असले तरी ती प्रत्यक्षात काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील विरुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई म्हणूनच पाहिले गेले. या निवडणूकीत आपला राजकीय दबदबा सिध्द करून पालकमंत्री पाटील यांनी चंद्रकांतदादांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून भाजपचे नवखे उमेदवार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला. या पराभवानंतर पेटून उठलेल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्यांतील महत्वाच्या सर्व सत्ता एकापाठोपाठ काबिज केल्या आहेत. विधानपरिषदेच्या २०१६ च्या निवडणूकीत त्यांनी तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून विजयी घौडदोड सुरु केली. त्यानंतर लगेच २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी आमचं ठरलंय अशी टॅगलाईन घेवून राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांच्या पराभवात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर लगेच

गोकुळने आपल्या दूध विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांनी वाढ केली

Image
दैनिक हुपरी समाचार : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने आपल्या दूध विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे दुधाचा दर प्रति लिटर 54 रुपयांवरून 58 रुपये झाला आहे. ही वाढ मुंबई-पुणे वगळता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात होणार आहे. इंधनाच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढल्याने गोकुळच्या विक्री दरात वाढ झाली आहे. शनिवारी 16 एप्रिल पासून ही दूध दरवाढ अंमलात येणार आहे, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गोकुळने पंधरा दिवसापुर्वी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. साधारणता खरेदी बरोबर विक्री दरात वाढ होते, मात्र संघाने केवळ खरेदी दरात वाढ केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच ठरला, संघाने खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करत असताना मात्र विक्री दरात चार रुपयांची वाढ करुन ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. देशात आधीच महागाईने सर्वसामान्य जनतेला हैराण केलं. एकीकडे गॅस दरवाढ, पेट्रोल डीझेलच्या दरात झालेली वाढ, यामुळे जनतेच्या खिशाला कात्री बसली असतानाच आता गोकुळच्या दूध दरात वाढ झाल्याने य

हुपरी नगरपरिषदेच्या पाचव्या वर्धापन दिना निमित्त

Image
स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत "भव्य होम मिनिस्टर स्पर्धा"चे आयोजन करण्यात आले.. हुपरी समाचार :  हुपरी नगरपरिषदेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधित सोमवारी स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत "भव्य होम मिनिस्टर स्पर्धा"चे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा स्मारक ग्राउंड हुपरी येथे पार पडलेल्या या भव्यदिव्य स्पर्धेत हुपरीतील शेकडो महिलांनी सहभाग घेऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. स्पर्धेत सहभागी सर्व महिला स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या स्पर्धकास "मानाची पैठणी" देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे कलर्स मराठी वरील "जीव माझा गुंतला" मालिकेतील चित्रा उर्फ प्रसिध्द अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर यांनी या स्पर्धेस भेट देऊन समस्त महिला वर्गाचा आनंद द्विगुणित केला. होम मिनिस्टर फेम मा.श्री. राजेश माने हे या स्पर्धेचे सादरकर्ते होते.  या देखण्या सोहळ्यास नगराध्यक्षा मा. सौ जयश्री महावीर गाट, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती मा. सौ सुप्रिया श्रीनिवास पालकर, आयकर विभाग कोल्हापूर

हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयास लवकरच मंजुरी - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

Image
 मंत्रालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळ यांच्या बैठकीत निर्णय. हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन व रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर तत्काळ सदर विषयाचा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत सादर करण्यात आला व सर्व त्रुटींची पूर्तताही करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण रुग्णालय मंजुरीप्रश्नी आज राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या दालनात आरोग्य विभाग व हुपरी येथील शिवसेना-राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. हुपरी व पंचक्रोशीतील गावांची एकूण लोकसंख्या २ लाखांवर आहे. तसेच हुपरी हे गाव चांदी उद्योगासाठी आशिया खंडात प्रसिद्ध आहे. शेजारील पंचतारांकित औद्योगिक वसाहत व लगतचा सीमाभाग यामुळे हुपरी गावाशी संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. तसेच भौगोलकदृष्ट्या हा भाग जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्य सोयींपासून वंचित आहे. 

12 एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज

Image
12 एप्रिलला पार पडणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष ... हुपरी समाचार :   मुंबई : 12 एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार आहे. 12 एप्रिलला पार पडणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. राज ठाकरे ठाण्याच्या सभेत या सर्व टीकांना उत्तर देणार आहेत. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असल्याचे म्हटले आहे.गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर उलटसुलट चर्चा अद्यापही सुरु आहे. राज ठाकरे यांनी त्यासभेत मशिदींवरील भोंगे, मदरशांमधील गैरप्रकार यावर भाष्य केले होते. तसेच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्या

कोरोना महामारी परमेश्वराने मानवजातीला दाखवलेल्या डेमो असून आता तरी सुधारणा होणे गरजेचे. ह भ प चैतन्य महाराज वाडेकर.

Image
हुपरी समाचार : हुपरी :  समृध्द जीवनासाठी संत तुकाराम महाराज, संत  ज्ञानेश्वर यांच्या अभंग ओव्यांचा अभ्यास करून त्यामधील विचार अंगीकारले पाहिजे . युवा पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन धर्म संस्कृती टिकवण्यासाठी काम करा आहे. कोरोना महामारी हा परमेश्वराने मानवजातीला दाखवलेला डेमो असून आता तरी सुधारणा होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.  पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेचे संचालक विलासराव नाईक यांच्या पत्नी व उद्योजक विवेक आणि रवी नाईक यांच्या मातोश्री स्वर्गीय विद्याताई नाईक यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त राष्ट्रीय युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर  यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .  यावेळी पैसा फंड बँकेचे संचालक विलासराव नाईक व चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक यांच्या हस्ते चैतन्य महाराजांचा सत्कार करण्यात आला . पैसा फंड बँकेचे  कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी स्वागत केले

शिराळा पंचायत समिति मध्ये पाणीटंचाई बाबत आढावा बैठकीत सांगली जि.म. बैंकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यानी मार्गदर्शन केले

Image
हुपरी समाचार : इस्लामपूर : शिराळा  आज येथील पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये तालुका पाणी टंचाईबाबत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आम गडदार मानसिंगराव नाईक होते. बैठकीत गावनिहाय पाणीटंचाई बाबत आढावा घेण्यात आला. 13 गावे 19 वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पैकी शिंदेवाडी व रांजणवाडी खालील बेंगडेवाडी येथे विहिर व कुपनलिका अधिगृहण करण्याचा प्रस्ताव आला आहे. उर्वरीत ठिकाणी कोणकोणत्या उपाय योजना करण्यात येणार आहेत, याबाबत आढावा घेण्यात आला. कोणत्याही गावात पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार मानसिंगभाऊ यांनी दिल्या. तसेच त्यांनी जलजिवन मिशन योजनेर्तगत कामे सुरू असलेल्या 11 गावातील कांमाचा आढावा घेतला. एकूण 81 पैकी 76 प्रस्ताव जलजिवन मिशन योजनेर्तगत जिल्हा परिषदेस प्रस्ताव सादर झाले आहेत. उर्वरीत चार प्रस्तावही येत्या चार दिवसात सादर होतील, अशी माहिती उप विभागीय जलसंधारण अधिकारी प्रविण तेली यांनी दिली. बैठकीस तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवा

राजसाहेबांवर टिका करण्याचा अधिकार ना शिवसेनेला आहे ना राष्ट्रवादीला

Image
 आज राजसाहेबांवर टिका करण्याचा अधिकार ना शिवसेनेला आहे ना राष्ट्रवादीला. कारण भुमिकेतलं सातत्य उद्धवजींनी आणि पवार साहेबांनी या आधीच दाखवून दिलय. त्यामुळे त्यांच्या चिल्लर गॅंगने गप्प राहिलेलं बरं. विषय कॉंग्रेसचा, तर ते आपल्या तत्वांसोबत आजही ठाम आहेत पण नाईलाजाने का होईना शिवसेनेसोबत जाऊन त्यांनी ही इथे तत्वांना तिलांजली दिलीच आहे.  सेनेतून बाहेर पडून २००६ मधे राज साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षाच्या झेंड्यात भगव्या सोबत निळ्या आणि हिरव्या रंगाला स्थान देऊन सर्वसमावेशक महाराष्ट्र धर्माचा विचार घेऊन विकासाच्या मुद्द्यावरच पक्ष पुढे न्यायचा हाच मुळ उद्देश होता. आज पक्षाचा जो शिवराजमुद्रा असलेला झेंडा आहे तो देखिल त्याचवेळी निवडणुक आयोगाकडे रजिस्टर केला होता. करायचं असतं तर तेव्हाच हिंदूत्वाचा मुद्दा घेऊनच राजकारणात उतरले असते. राज साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा सेनेने मराठीचा मुद्दा गुंडाळून ठेवून बराच काळ लोटला होता. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी माणसाला कोणी वाली उरला नव्हता. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या गायपट्ट्यातून आलेल्या परप्रांतियांची अरेराव

समाज व देशाला पुढे नेहण्यासाठी मुस्लिम समाजात शैक्षणिक क्रांतीची गरज - सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांचा एकसूर

Image
 अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर " विचारमंथन शिबीर " हुपरी समाचार : पिंपरी चिंचवड : अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी येथील अल्पाइन हॉटेल मध्ये पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर एकदिवसीय " विचारमंथन शिबीर " आयोजित करण्यात आले होते.   शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पिंपरी चिचंवड एजुकेशन सोसायटीचे सचिव गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विचारमंथन शिबिरात पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजातील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.* पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. *शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी शहरातील उर्दू शाळा , मुस्लिम विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती , समाजातील गरीब दुर्बल घटकांच्या वैद्यकीय गरजा ,रोजगार , करिअर मार्गदर्शन शिबिरे , ग्रंथालय , कायदेशीर सल्ला केंद्र ,कौटुंबिक कलह ,आरक्षित असलेल्या परंतु ताब्यात नसलेल्या कब्रस्तानच्या जमिनी , वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमण , सांस्कृतिक भवन , व्यसनमुक्ती केंद्र , मुस्लिम आरक्षण , मुस्लिम समाजव

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण सुरु झाले... राज ठाकरे

Image
  मुंबईच्या शिवतीर्थावर मनसेचा 'पाडवा मेळावा होत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शिवतीर्थावर गर्दी ओसंडून वाहत होती. याआधी 9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी पुण्यात बोलताना राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा ट्रेलर असून, पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन असे ते म्हणाले होते. आता आज या मेळाव्यात बोलताना राजा ठाकरे यांनी सुरुवातीला, कोरोना विषाणू, महामारी व त्याकाळात भोगलेल्या अनुभवांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले. त्यानंतर त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल आठवण करून दिली. ते म्हणाले, 'त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या विरुद्ध उभी होती. निवडणुकीआधी राज्यात भाजपच्या अनेक सभा झाल्या परंतु अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काही चर्चा झाली नव्हती. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यावर आपल्यामुळे सरकार

जक्राईवाडीच्या उपसरपंचपदी विलास माने

Image
 " ग्रामपंचायतीने जोपासली सामाजिक बांधिलकी : देश सेवा केल्याबद्दल दिली संधी" हुपरी समाचार : वाळवा तालुक्यातील जक्राईवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुभेदार विलास भगवंत माने  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक बाजीराव मिसाळ यांनी काम पाहिले.  सरपंच सौ अंकिता दिग्विजय माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये निवड करण्यात आली. माजी उपसरपंच  राजाका गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नूतन उपसरपंच निवडण्याकरीता घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामपंचायतीने देश सेवा केलेल्या माजी सैनिकाना उपसरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे सदस्य व सेवानिवृत्त सैनिक सुभेदार विलास भगवंत माने यांची एकमताने निवड केली. यावेळी माजी सरपंच, विद्यमान सदस्य दिग्विजय माने यांनी स्वागत केले. तर ज्येष्ठ नेते बाजीराव गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. व ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या विकास कामाची माहिती दिली.  या कार्यक्रमास सरपंच सौ अंकिता दिग्विजय माने,सदस्या सौ कमल अशोक गायकवाड, सौ राजाक्का भगवान गायकवाड,

डांगे फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. प्रियांका जाधव यांना पीएचडी

Image
हुपरी समाचार :   आष्टा दि (प्रतिनिधी) : सुभाष देशमुख संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील,अण्णासाहेबडांगे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रियांका जाधव -गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाची फार्मसी मधील नामांकित पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.  प्रा.जाधव यांनी सायक्लोडेक्ट- टेक्निकल या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय रत्नागिरी येथील सहयोगी प्राध्यापक व फार्मास्यूटिकल केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉक्टर योगेश पोरे यांचे या शोध निबंधक का साठी मार्गदर्शन लाभले .तसेच शासकीय औषधनिर्माण शास्त्र कराड येथील प्राचार्य डॉक्टर के. बि. बुराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिवाय  संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्राध्यापक आर. ए. कनाई, रजिस्टर शैलेंद्र हिरवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एम.जी. सरलया , उपप्राचार्य एस.जी साजणे, डॉक्टर आर .एस. जगताप यांचेही त्यांना विशेष सहकार्य लाभले. या यशाबद्दल जाधव - गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.