डांगे फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. प्रियांका जाधव यांना पीएचडीहुपरी समाचार : 

 आष्टा दि (प्रतिनिधी) : सुभाष देशमुख

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील,अण्णासाहेबडांगे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रियांका जाधव -गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाची फार्मसी मधील नामांकित पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. 

प्रा.जाधव यांनी सायक्लोडेक्ट- टेक्निकल या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय रत्नागिरी येथील सहयोगी प्राध्यापक व फार्मास्यूटिकल केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉक्टर योगेश पोरे यांचे या शोध निबंधक का साठी मार्गदर्शन लाभले .तसेच शासकीय औषधनिर्माण शास्त्र कराड येथील प्राचार्य डॉक्टर के. बि. बुराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिवाय  संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्राध्यापक आर. ए. कनाई, रजिस्टर शैलेंद्र हिरवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एम.जी. सरलया , उपप्राचार्य एस.जी साजणे, डॉक्टर आर .एस. जगताप यांचेही त्यांना विशेष सहकार्य लाभले. या यशाबद्दल जाधव - गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post