हुपरी समाचार :
हुपरी : समृध्द जीवनासाठी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंग ओव्यांचा अभ्यास करून त्यामधील विचार अंगीकारले पाहिजे . युवा पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन धर्म संस्कृती टिकवण्यासाठी काम करा आहे. कोरोना महामारी हा परमेश्वराने मानवजातीला दाखवलेला डेमो असून आता तरी सुधारणा होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.
पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेचे संचालक विलासराव नाईक यांच्या पत्नी व उद्योजक विवेक आणि रवी नाईक यांच्या मातोश्री स्वर्गीय विद्याताई नाईक यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त राष्ट्रीय युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी पैसा फंड बँकेचे संचालक विलासराव नाईक व चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक यांच्या हस्ते चैतन्य महाराजांचा सत्कार करण्यात आला . पैसा फंड बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी स्वागत केले