हुपरी नगरपरिषदेच्या पाचव्या वर्धापन दिना निमित्त

स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत "भव्य होम मिनिस्टर स्पर्धा"चे आयोजन करण्यात आले..

हुपरी समाचार :

 हुपरी नगरपरिषदेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधित सोमवारी स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत "भव्य होम मिनिस्टर स्पर्धा"चे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा स्मारक ग्राउंड हुपरी येथे पार पडलेल्या या भव्यदिव्य स्पर्धेत हुपरीतील शेकडो महिलांनी सहभाग घेऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. स्पर्धेत सहभागी सर्व महिला स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या स्पर्धकास "मानाची पैठणी" देऊन गौरविण्यात आले.


विशेष म्हणजे कलर्स मराठी वरील "जीव माझा गुंतला" मालिकेतील चित्रा उर्फ प्रसिध्द अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर यांनी या स्पर्धेस भेट देऊन समस्त महिला वर्गाचा आनंद द्विगुणित केला. होम मिनिस्टर फेम मा.श्री. राजेश माने हे या स्पर्धेचे सादरकर्ते होते. 

या देखण्या सोहळ्यास नगराध्यक्षा मा. सौ जयश्री महावीर गाट, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती मा. सौ सुप्रिया श्रीनिवास पालकर, आयकर विभाग कोल्हापूरच्या उपायुक्त मा. सौ. प्राजक्ता ठाकूर-खटावकर, गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी च्या अप्पर पोलीस अधीक्षक मा. सौ. जयश्री गायकवाड यांसह शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व रसिक नागरिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.

सत्ताधारी भाजपाचे पक्षप्रतोद, ताराराणीचे पक्षप्रतोद, दुःखात असताना हा भव्य सोहळा संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post