विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढाविण्या साठी शालेय स्तरावरील बक्षिस योजना प्रेरणादायी ठरतील : अजित कदमहुपरी समाचार :

इस्लामपूर : 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्याना प्रेरणा मिळावी त्याची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने शालेय स्तरावर सुरू केलेली बक्षिस योजना इतरांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित कदम यांनी व्यक्त केला ते नव महाराष्ट्र विद्यालय, चितळी ता खटाव येथे कै. मा. प्राचार्य तुकाराम ज्ञानू कदम चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.श्रीमती शेवंताबाई ज्ञानू कदम व कै. श्री. ज्ञानू सिताराम कदम यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या बक्षीस योजनेच्या बक्षीस समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .

 यावेळी विद्यालया तील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत च्या प्रथम 3   क्रमांक मिळवविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना मुख्याध्यापक जी.ए .साठे म्हणाले विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते  प्रयत्न करत आहेत त्यामुळेच 8 वी शिष्यवृत्ती व सारथी एन.एम .एम.एस शिष्यवृत्ती ,संस्थेच्या निबंध, चित्रकला या विभाग स्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.

या कार्यक्रमाला सरपंच सतीश भिसे,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष राजाराम पवार, शिवाजी सरगर,महेंद्र आगवणे,भगवान गायकवाड, चंद्रकांत कदम,आकाश कदम, सलामत नदाफ,यु .बी .जाधव. एस.के. तुपे, व्ही .पी पाटील,व्ही.डी हांगे, एस.के. जाधव,, यु व्ही हांगे,श्रीमती डी यु. धोंगडे, श्रीमती व्ही एस. गोसावी, बी.एन .कोळेकर कु .पी. एस. धेंडे ,यु डी .खरात उपस्थित होते .

स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक जी ए साठे यांनी केले .आर.डी. जगदाळे यांनी सूत्रसंचलन केले.एस.बी.रायनाडे यांनी आभार मानले.


फोटो ओळी--चितळी येथे मुख्याध्यापक जी.ए .साठे यांचे हस्ते अंकिता सरगर हिला बक्षीस देण्यात आले.यावेळी राजेंद्र पवार,अजित कदम उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post