राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी महिन्यातून एक तास वेळ द्यावा गावपातळीवर एकत्रित पणे चर्चा करावी: ना. जयंत पाटील


हुपरी समाचार :

इस्लामपूर : 

रेड (ता. शिराळा) येथे आज शिराळा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता परिवार संवाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतरावजी पाटीलसाहेब यांच्या उपस्थित पार पडली. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार मतदार संघातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष, मंत्री मा. ना. पाटीलसाहेब यांनी मार्गदर्शन केले. थेट कार्यकर्त्यांशी सवांद साधला. त्यांचे शंका समाधान केले. गावपातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. अडचणी सोडविण्याबाबतचे उपाय योजना सांगितल्या. 

यावेळी बोलताना मंत्री पाटीलसाहेब म्हणाले, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी महिन्यातून एक तास वेळ द्यावा. गावपातळीवर एकत्रित चर्चा करावी. बूथ कमिटी निहाय समित्यांच्या बैठका घ्याव्यात. प्रत्येक गावात राष्ट्रवादी सक्षम करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आपणाला येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्ष्याचे दोनशे आमदार निवडून आणावयाचे आहेत. सध्या प्रत्येक वस्तूच्या वाढत चाललेल्या महागाई बाबत नागरीकांत चर्चा करावी. पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादी शक्ती पुन्हा डोके वर काढू लागलीत, त्यांना व त्यांच्या विचारांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे.

यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील गव्हाणे, महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. कार्यक्रमास आमदार अरुणअण्णा लाड, युवा नेते प्रतिक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील व चिमनभाऊ डांगे, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, युवती जिल्हाध्यक्ष पूजा लाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील व रणजीत पाटील, रणधीर नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंग नाईक, रवींद्र बर्डे, नेताजी पाटील, भीमराव पाटील, संजयबापू पाटील, विश्वासराव पाटील, सुखदेव पाटील, छायाताई पाटील, प्रमोद नाईक, भूषण व शाहू नाईक, युवकचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रथमेश शिंदे, युवती तालुकाध्यक्ष शितल पाटील, सभापती मनिषा गुरव, महिला वाळवा तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, शिराळा शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, युवक अध्यक्ष अमित गायकवाड, महिला अध्यक्ष रुपाली कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळा मतदार संघातील इतर पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विश्वास, विराज व यशवंत उद्योग समुहातील सुहातील सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव बी. के. नायकवडी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post