जक्राईवाडीच्या उपसरपंचपदी विलास माने

 " ग्रामपंचायतीने जोपासली सामाजिक बांधिलकी : देश सेवा केल्याबद्दल दिली संधी"


हुपरी समाचार :

वाळवा तालुक्यातील जक्राईवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुभेदार विलास भगवंत माने  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक बाजीराव मिसाळ यांनी काम पाहिले.

 सरपंच सौ अंकिता दिग्विजय माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये निवड करण्यात आली. माजी उपसरपंच  राजाका गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नूतन उपसरपंच निवडण्याकरीता घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामपंचायतीने देश सेवा केलेल्या माजी सैनिकाना उपसरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे सदस्य व सेवानिवृत्त सैनिक सुभेदार विलास भगवंत माने यांची एकमताने निवड केली. यावेळी माजी सरपंच, विद्यमान सदस्य दिग्विजय माने यांनी स्वागत केले. तर ज्येष्ठ नेते बाजीराव गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. व ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या विकास कामाची माहिती दिली.

 या कार्यक्रमास सरपंच सौ अंकिता दिग्विजय माने,सदस्या सौ कमल अशोक गायकवाड, सौ राजाक्का भगवान गायकवाड, सौ वैशाली किरण गायकवाड, श्रीमती उषा विश्वास गायकवाड, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य युवा नेते दिग्विजय माने, जेष्ठ नेते बाजीराव गायकवाड, सोसायटी चेअरमन बाळासाहेब गायकवाड, सोसायटी व्हा.चेअरमन शामराव गायकवाड, पाणी पुरवठा संचालक पांडुरंग गायकवाड, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रदिप गायकवाड, रघुनाथ गायकवाड, तानाजी जगन्नाथ गायकवाड, आनंदा गायकवाड, दत्तात्रय दळवी, तुकाराम गायकवाड, तानाजी माने, कर्मचारी युवराज पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रदीप गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

    एकच ध्यास गावाचा विकास...

 ग्रामपंचायतींने व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उपसरपंच पदाची संधी दिली. या मिळालेल्या संधीचे माध्यमातून मी गावाचा सर्वांगीण विकास करण्यास सदैव कटिबद्ध आहे. ज्याप्रमाणे मी देशाची सेवा केली त्याप्रमाणे माझ्या जन्मभूमीची सेवा करण्याची मला संधी मिळाली. हे माझे भाग्य समजतो.

 सुभेदार विलास माने....उपसरपंच,जक्राईवाडी

 *फोटो ओळी*- जक्राईवाडीच्या उपसरपंचपदी विलास माने यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना दिग्विजय माने, बाळासाहेब गायकवाड, बाजीराव गायकवाड व इतर.

Post a Comment

Previous Post Next Post