हुपरी समाचार :
इस्लामपूर :
शिराळा आज येथील पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये तालुका पाणी टंचाईबाबत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आम गडदार मानसिंगराव नाईक होते. बैठकीत गावनिहाय पाणीटंचाई बाबत आढावा घेण्यात आला. 13 गावे 19 वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पैकी शिंदेवाडी व रांजणवाडी खालील बेंगडेवाडी येथे विहिर व कुपनलिका अधिगृहण करण्याचा प्रस्ताव आला आहे. उर्वरीत ठिकाणी कोणकोणत्या उपाय योजना करण्यात येणार आहेत, याबाबत आढावा घेण्यात आला. कोणत्याही गावात पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार मानसिंगभाऊ यांनी दिल्या. तसेच त्यांनी जलजिवन मिशन योजनेर्तगत कामे सुरू असलेल्या 11 गावातील कांमाचा आढावा घेतला. एकूण 81 पैकी 76 प्रस्ताव जलजिवन मिशन योजनेर्तगत जिल्हा परिषदेस प्रस्ताव सादर झाले आहेत. उर्वरीत चार प्रस्तावही येत्या चार दिवसात सादर होतील, अशी माहिती उप विभागीय जलसंधारण अधिकारी प्रविण तेली यांनी दिली. बैठकीस तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, उपसभापती बी. के. नायकवडी, गट विकास अधिकारी संतोष राऊत, भूषण नाईक, शाखा अभियंता बी. बी. हुक्केरी, एस. आर. साळुंखे तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.