भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

 सून चंपा सून तारा…कोई जिता कोई हिमालय मे गया...संध्या सव्वालाखे .


हुपरी समाचार :

पुणे : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा तब्बल 18,901 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा देखील मान मिळवलाय.संपुर्ण राज्याचं लक्ष असलेल्या या निवडणूक निकालानंतर आता राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

निवडणूक हारलो तर हिमालयात जाईल, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. अशातच आता महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी व्हिडीओ शेअर करत चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे.

सून चंपा सून तारा…कोई जिता कोई हिमालय मे गया, असं ट्विट संध्या सव्वालाखे यांनी केलं आहे. भाजपची धूळधाण करत कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील जयश्री जाधव यांचा ऐतिहासिक विजय हा प्रत्येक कोल्हापूरकराचा विजय आहे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला जनतेनी एकाधिकाराने पसंती दिली आहे, असंही सध्या सव्वालाखे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

Post a Comment

Previous Post Next Post