जागतिक पुस्तक दिन

 


हुपरी समाचार :

     दरवर्षी २३ एप्रिलला शंभरहून अधिक देशात साजरा होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनाचे २०२२ रौप्य महोत्सवी वर्ष आहे. औपचारिक दृष्ट्या २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी १९२३ पासून पुस्तक दिन ही कल्पना राबवली जाते.

     २३ एप्रिल १९२३ ला स्पेनमध्ये मिगुएल सर्वेंटीस च्या स्मृतीसाठी पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा करण्यात आला. इंग्लंड मध्ये मार्च महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. ३८ नाटके लिहणारा विल्यम शेक्सपियर याचा जन्म व मृत्यू दिवस २३ एप्रिल आहे. इंका गार्सिलोसा, सर्व्हेंटीस, विल्यम वर्डस्वर्थ ब्लादिमिर नाबोकाव यांचा ही स्मृतीदिन २३ एप्रिल आहे. युनेस्को  (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) म्हणजे मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांनी १९९५ ला २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन व कॉपी राईट दिन म्हणून मान्य केला. १९९५ ला युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या सर्व साधारण सभेत वाचन आवड व लेखक सन्मान करण्यासाठी या दिवसाला मान्यता देण्यात आली. वाचनाची आवड, लेखक व पुस्तकांचा सन्मान ही संकल्पना आहे. वाचन, लेखन, प्रकाशन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. भारत सरकारने २३ एप्रिल २००१ पासून हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला सुरवात केली. विनामूल्य पुस्तक वितरण, स्पर्धा, पुरस्कार अशा कार्यक्रमांद्वारे वाचनाविषयी आवड व जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.

     दरवर्षी जागतिक पातळीवर पुस्तकांची राजधानी निवडली जाते. आतापर्यंत शारजा, माद्रिद, मट्रीयल अमस्टरडम, क्रोनकी, बँकाक, अथेन्स, व्रोक्ला, बोगोटा, बैरूत, इंचिऑन, येरेवान आदि शहरे पुस्तक राजधानी म्हणून निवडण्यात आली. २००३ ला आपले नवी दिल्ली हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. पुस्तकाच्या राजधानीत वर्षभर पुस्तक स्वामित्व हक्क, वाचन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. यंदा मेक्सिकोतील गुडलजरा हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित झाले आहे. कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम झाले. 

     युनेस्को मार्फत पुस्तक राजधानी प्रमाणेच दरवर्षी वाचकांसाठी संदेश, theme, संकल्पना दिली जाते. यंदा, you are a reader तुम्ही वाचक आहात ही मुलांसाठी संकल्पना आहे. २००३ ला दिल्ली पुस्तकाची राजधानी असताना, ' जीवनाचा दोस्त - पुस्तक ' असा संदेश होता. आतापर्यंत वाचन म्हणजे थंड हवा, एक पुस्तक द्या, आनंदाचे तास, जीवनाचा मित्र, वाचन एक अखंड यात्रा, अभ्यास, कायमस्वरुपी साक्षरता जीवन बदलते, वाचन हाच उपाय, भाषेचं आंतरराष्ट्रीय वर्षे, गुणवत्तापूर्ण   शिक्षणाचा विकास, प्रकाशन, मानवाधिकार, संस्कृती संपर्क, पुस्तक निर्मितीचा इतिहास - लिहण्यापासून डिजीटल पर्यंत, पुस्तके आणि अनुवाद, वाचन ही बौद्धिक संपदेची सुरक्षा, पुस्तक वाचा, हुशार व्हा, जग वाचा, वाचन माझा अधिकार, कथा share करा, पुस्तक : जगाची खिडकी अशा संकल्पना व संदेशावर काम करण्यात आले. ज्ञान व मनोरंजनासाठी पुस्तके उपयुक्त -

जागतिक पुस्तक दिन - प्रश्न -

१) वाचतच येत नाही. वाचन शक्य नाही.

२) वाचता येत असून वाचत नाहीत. 

     सर्वसाधारणपणे चांगले वाचक नेहमीच अल्पमतात असतात. ऐकण आणि बोलणं यातून मौखिक संस्कृती तर लिहणं आणि वाचन यातून साहित्य व वाचन संस्कृती निर्माण झाली. साहित्य व्यवहारातील मंडळीनी इंटरनेटच्या जमान्यात बदललेल्या वाचन सवयी लक्षात घेतल्या पाहिजेत. ५० हजार वर्षांपूर्वी बोलण्याचा, दहा हजार वर्षांपूर्वी लिहण्याचा तर १९९२ पासून इंटरनेट या साहित्य व्यवहारातील महत्वाच्या क्रांत्या आहेत. Facebook, Instagram, YouTube ही अलीकडच्या पिढीची माध्यमं आहेत. वानगी दाखल विज्ञान लेखक, डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या Post YouTube वर १ कोटी लोक पाहतात तर ७६ लाख Subscribers आहेत. वाचक, लेखक, प्रकाशकांनी तंत्रस्नेही बनून साहित्य व वाचन संस्कृतीचे हे बदलले आयाम लक्षात घेऊन कार्यरत रहावे असे मला वाटते.


                     डॉ. संजय थोरात.

Post a Comment

Previous Post Next Post