12 एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज

12 एप्रिलला पार पडणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष ...

हुपरी समाचार :

 मुंबई : 12 एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार आहे.12 एप्रिलला पार पडणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. राज ठाकरे ठाण्याच्या सभेत या सर्व टीकांना उत्तर देणार आहेत. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असल्याचे म्हटले आहे.गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर उलटसुलट चर्चा अद्यापही सुरु आहे. राज ठाकरे यांनी त्यासभेत मशिदींवरील भोंगे, मदरशांमधील गैरप्रकार यावर भाष्य केले होते. तसेच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता.

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला त्यांनी हात घातला. आता 12 तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये आहेत. परंतु त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्या अगोदर पुण्यात मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी मनसैनिकांना संबोधित केले होते. राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचे मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केले आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


Post a Comment

Previous Post Next Post