Posts

Showing posts from May, 2022

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भूसंपादन विभागामधील तत्कालीन लिपिक सतीश गणपतराव सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी अर्चना सतीश सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Image
  हुपरी समाचार : कोल्हापूर :  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामधील तत्कालीन लिपिक सतीश गणपतराव सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी अर्चना सतीश सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंध विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांनी सूर्यवंशी दाम्पत्य विरोध फिर्याद दाखल केली. सूर्यवंशी यांच्या पाचगाव येथील हाऊसिंग सोसायटीमधील श्री बंगलासह आणि मालमत्तांच्या ठिकाणी पथकाने झडती घेऊन तपासणी केली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना सतीश सूर्यवंशी यांनी अधिकाराचा गैरवापर करून बेहिशोबी मालमत्ता केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या विभागाचे पुणे विभागीय पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी पोलीस उपाधिक्षक बुधवंत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांना उघड चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही चौकशी प्रक्रिया सुरू होती. चौकशीत ज्ञात उत्पन्नापेक्षा म्हण

आंघोळ आणि धुणेही आता महाग झाले

Image
महागाईने आता बाथरूमलाही आपल्या कवेत घेतले आहे. हुपरी समाचार :   नवी दिल्ली - देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बुधवारी जेव्हा आरबीआयने रेपो दरात वाढ केली, तेव्हा देशातील बँकांनीही व्याजदर वाढवले. आरबीआयच्या या निर्णयानंतर महागाई आणखी वाढण्याची अपेक्षा होती आणि आज त्याचा परिणाम दिसून आला. आंघोळ आणि धुणेही आता महाग झाले आहे, होय किचनमधून सुरू झालेल्या महागाईने आता बाथरूमलाही आपल्या कवेत घेतले आहे. खरे तर, देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने साबण, शाम्पू आणि इतर वैयक्तिक काळजी उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. एका अहवालानुसार, कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या वाढीनंतर तुमचे बाथरूमचे बजेट नक्कीच विस्कळीत होणार आहे. एवढेच नाही तर HUL ने टूथपेस्ट, केचपसह इतर वस्तूंच्या किमतीही वाढवल्या असून त्यांच्या किमती 4 ते 13 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच, HUL चे CEO संजीव मेहता यांनी तेलाच्या किमतीत वाढ होत असताना MMCG उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते. अहवालात वितरक स

हुपरीतील मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हटवा....मनसेचे निवेदन

Image
हुपरी समाचार : हुपरीतील मशिदीवरील भोंग्यांवरून दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते. दिवसभरात पाच वेळा भोंगे वाजवत असलेमुळे त्या आवाजाने त्या त्या भागात ध्वनी प्रदूषण निर्माण होते.यामुळे समाज स्वास्थ्य बिघडत चालले आहे. दररोजच्या या त्रासाला सर्वजण त्रासले आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व मशिदींवरील भोंगे काढणेबाबत यापूर्वीच आदेश दिला आहे.या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी. आमचे नेते मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई न झालेस गुरुवार दि.५ मे रोजी सायंकाळी ५ वा. मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली जाईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरीच्या वतीने हुपरी पोलिस ठाणे येथे निवेदन देणेत आले आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील, शहराध्यक्ष गणेश मालवेकर, नगरसेवक अमर गजरे, विभाग अध्यक्ष पदमाकर चौगुले, शहर उपाध्यक्ष सुहास यादव, सागर गायकवाड, दिपक गजरे, ऋषीकेश साळी, उमाजी पाटील, पुष्पराज शेटके, निलेश वाईंगडे, प्रशांत पाटील, महादेव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हुपरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. पंकज गिरी यांनी याकामी योग्य कारवाई करणेचे आश्वासन दिले.

राज ठाकरे भोंग्यां विरोधातील आंदोलनाबाबत आपली पुढील भूमिका मांडण्याची शक्यता

Image
  हुपरी समाचार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत आजपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं असून त्याला कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पासून अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान बुधवार पहाटेपासूनच अनेक ठिकाणी भोंग्यावर नमाज न होता भोंग्याशिवाय नमाज अदा करण्यात आल्याचंही दिसून आलं आहे. राज यांच्या या भूमिकेनंतर आज दिवसभरामध्ये भोंग्यांचा हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. 11:06 (IST) 4 May 2022 राज ठाकरेंनी आरती केलेल्या मंदिरात आज महाआरती पुण्यातील कुमठेकर रोडवरील खालकर चौक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मारुती मंदिरात हन

हुपरी मनसेतर्फे ३००० शिवमुर्ती नागरीकांना प्रदान

Image
शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद...शिवमुर्ती नेणेसाठी शिवभक्तांची लागली रीघ... महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भगवा रक्षक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवराय मनामनात..शिवजयंती घराघरात..हा संकल्प यशस्वी..!   -  नगरसेवक दौलतराव पाटील                                           हुपरी समाचार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भगवा रक्षक संघटना हुपरी यांचे वतीने छत्रपती शिवराय मनामनात..शिवजयंती घराघरात..या संकल्प अंतर्गत हुपरी शहरात ११०० शिवमुर्ती शिवभक्तांना प्रदान करण्याचा संकल्प केला होता. यास उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत असून शिवभक्तांनी मनसे कार्यालयात शिवमुर्तीसाठी अक्षरशः रांगा लावल्या आहेत. हा प्रतिसाद पाहून नगरसेवक दौलतराव पाटील यांनी ३००० शिवमुर्ती प्रदान करणेचे ठरविले आहे.