हुपरी मनसेतर्फे ३००० शिवमुर्ती नागरीकांना प्रदान


शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद...शिवमुर्ती नेणेसाठी शिवभक्तांची लागली रीघ...


महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भगवा रक्षक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवराय मनामनात..शिवजयंती घराघरात..हा संकल्प यशस्वी..!   -  नगरसेवक दौलतराव पाटील 

                                        


हुपरी समाचार :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भगवा रक्षक संघटना हुपरी यांचे वतीने छत्रपती शिवराय मनामनात..शिवजयंती घराघरात..या संकल्प अंतर्गत हुपरी शहरात ११०० शिवमुर्ती शिवभक्तांना प्रदान करण्याचा संकल्प केला होता. यास उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत असून शिवभक्तांनी मनसे कार्यालयात शिवमुर्तीसाठी अक्षरशः रांगा लावल्या आहेत. हा प्रतिसाद पाहून नगरसेवक दौलतराव पाटील यांनी ३००० शिवमुर्ती प्रदान करणेचे ठरविले आहे. Post a Comment

Previous Post Next Post