हुपरी समाचार :
हुपरीतील मशिदीवरील भोंग्यांवरून दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते. दिवसभरात पाच वेळा भोंगे वाजवत असलेमुळे त्या आवाजाने त्या त्या भागात ध्वनी प्रदूषण निर्माण होते.यामुळे समाज स्वास्थ्य बिघडत चालले आहे. दररोजच्या या त्रासाला सर्वजण त्रासले आहेत.
मा.सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व मशिदींवरील भोंगे काढणेबाबत यापूर्वीच आदेश दिला आहे.या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी. आमचे नेते मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई न झालेस गुरुवार दि.५ मे रोजी सायंकाळी ५ वा. मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली जाईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरीच्या वतीने हुपरी पोलिस ठाणे येथे निवेदन देणेत आले आहे.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील, शहराध्यक्ष गणेश मालवेकर, नगरसेवक अमर गजरे, विभाग अध्यक्ष पदमाकर चौगुले, शहर उपाध्यक्ष सुहास यादव, सागर गायकवाड, दिपक गजरे, ऋषीकेश साळी, उमाजी पाटील, पुष्पराज शेटके, निलेश वाईंगडे, प्रशांत पाटील, महादेव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हुपरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. पंकज गिरी यांनी याकामी योग्य कारवाई करणेचे आश्वासन दिले.