Posts

Showing posts with the label इस्लामपूर

जक्राईवाडीच्या उपसरपंचपदी विलास माने

Image
 " ग्रामपंचायतीने जोपासली सामाजिक बांधिलकी : देश सेवा केल्याबद्दल दिली संधी" हुपरी समाचार : वाळवा तालुक्यातील जक्राईवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुभेदार विलास भगवंत माने  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक बाजीराव मिसाळ यांनी काम पाहिले.  सरपंच सौ अंकिता दिग्विजय माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये निवड करण्यात आली. माजी उपसरपंच  राजाका गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नूतन उपसरपंच निवडण्याकरीता घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामपंचायतीने देश सेवा केलेल्या माजी सैनिकाना उपसरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे सदस्य व सेवानिवृत्त सैनिक सुभेदार विलास भगवंत माने यांची एकमताने निवड केली. यावेळी माजी सरपंच, विद्यमान सदस्य दिग्विजय माने यांनी स्वागत केले. तर ज्येष्ठ नेते बाजीराव गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. व ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या विकास कामाची माहिती दिली.  या कार्यक्रमास सरपंच सौ अंकिता दिग्विजय माने,सदस्या सौ कमल अशोक गायकवाड, सौ राजाक्का भगवान गायकवाड,

आंधळी हायस्कूलमध्ये 'माझी वसुंधरा अभियान' उत्साहात संपन्न.

Image
हुपरी समाचार : इस्लामपूर  :आंधळी येथील श्री.दत्त एज्युकेशन सोसायटीअंकलखोप संचलित हिंदकेसरी गणपतरावआंधळकर हायस्कूल आंधळीमध्ये 'माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  या मध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियानाचे महत्त्व सांगून तिचे रक्षण करण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून शपथही घेणेत आली.यावेळी वैदही माने,धनश्री माने व प्रदुम्न गोसावी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर सरपंच अमित चव्हाण व उपसरपंच माणिक माने यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे संयोजनआर.आर गायकवाड, एम.एन.माने,आर.एम.खामकर , ए.ए.पाटील,डी.व्ही.बंडगर पी.पी.पाटील,एस.एस.कांबळे,यु.बी.शिंदे , बी.एच.जाधव, राजाराम जाधव व हिम्मत शिंदे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन डी.सी.चौधरी यांनी तर आभार एस.पी.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष विष्णु माने,सचिव नरेंद्र पाटील व संचालक नानासो

प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उदघाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले

Image
दैनिक हुपरी समाचार : इस्लामपूर : पाचगणी (ता. शिराळा) : येथे ३ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उदघाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री मा. ना. पाटील साहेब व आमदार नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या प्रसंगी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, तालुक्याच्या सभापती मनीषा गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, भूषण नाईक, गट विकास अधिकारी संतोष राऊत, विश्वासचे संचालक संभाजी पाटील व शिवाजी पाटील, कोंडीबा चौगले, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, आरळ्याचे उपसरपंच सदाजी पाटील, शंकर मोहिते, मणदूरचे उपसरपंच विजय चौगले, पाचगणीचे सरपंच शंकर पाटील, उपसरपंच सुषमा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पाटील, सविता पाटील, रामीत खैर, आशा पाटील व दीपाली पाटील, सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, गोविंद पाटील, अशोक चव्हाण, राघू कांबळे, हणमंत पा

विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही त्याच्या निविदा का काढल्या जात नाहीत

Image
राष्ट्रवादी सदस्यांनी अपयशी सत्ताधाऱ्यांचा निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   इस्लामपूर : शहरातील ३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही त्याच्या निविदा का काढल्या जात नाहीत  कुणाच्या सांगण्यावरून ही कामे थांबवली जात आहेत. प्रशासन किती दिवस टाळाटाळ करणार असा आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. याच वेळी राष्ट्रवादी सदस्यांनी अपयशी सत्ताधाऱ्यांचा निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पालिका सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत मागील तहकूब विशेष सभा झाली. यावेळी पुन्हा विषय पत्रिकेवरील कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीच्या आनंदराव मलगुंडे यांनी ३ कोटी २५ लाखांच्या कामाच्या निविदा काढा अशी मागणी केली. त्यावर बांधकाम अभियंत्यांनी त्याला होकार दिला. हाच धागा पकडत विकास आघाडीच्या विक्रम पाटील यांनी पुन्हा प्रशासनाच्