उल्हासनगर : जगभरातील सिंधी समाजाचे दैवत असलेल्या उल्हासनगर मधील चालिया मंदिराच्या दानपेटीवर माजी सुरक्षा रक्षकानेच डल्ला मारला
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : उल्हासनगर : जगभरातील सिंधी समाजाचे दैवत असलेल्या उल्हासनगर मधील चालिया मंदिराच्या दानपेटीवर माजी सुरक्षा रक्षकानेच डल्ला मारला आहे.दानपेटीतील चिल्लरचे पोते खांद्यावर नेत असतानाच हा रक्षक हिललाईन पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.विशेष म्हणजे पोत्यातील 6 हजाराची चिल्लर मोजण्यासाठी दीडदोन तास घेण्याची वेळ पोलिसांवर आली. या चिल्लर चोर आरोपीचे नाव लालजित कुमार लोधी आहे.लालजित हा यापूर्वी चालिया मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा.शुक्रवारच्या रात्री लालजितन मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली.आणि त्यातील सर्व चिल्लर आणि थोड्या प्रमाणात 10,20,50,100 च्या नोटा पोत्यात भरून घेऊन पोबारा केला. लालजित हा कैलास कॉलनी च्या दिशेने इकडेतिकडे बघून संशयास्पदरित्या जात असतानाच हिललाईन ठाण्याचे पोलीस नाईक भटू महाले आणि कॉन्स्टेबल नरेंद्र बागुल यांनी लालजितला हटकले तेंव्हा त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्याला पकडल्यावर आणि पोते तपासल्यावर त्यात चिल्लर आढळून आली. लालजितला पोलीस ठाण्यात आणल्यावर हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपूत्र यांनी त्या